‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत होणार एकदम ‘कडक’ अभिनेत्रीची एन्ट्री

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत होणार एकदम ‘कडक’ अभिनेत्रीची एन्ट्री

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील सध्या प्रचंड चालत आहे. या मालिकेमध्ये सर्वच पात्रांनी चांगली भूमिका केली आहे. मात्र, विशेष म्हणजे जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री हे सगळ्यांनाच आवडत आहे. जयदीप याचे खरे नाव मंदार जाधव आहे.

मंदार जाधव याने अनेक हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. या मालिकेत वर्षा उसगावकर यांची देखील भूमिका आहे वर्षा उसगावकर यांनी देखील चांगले काम केले आहे. अनेक वर्षानंतर वर्षा उसगावकर या मालिकेत दिसत आहेत. याआधी मंदार याने हिंदीमध्ये आलादिन मालिका केली होती ही मालिका त्यावेळी चांगली चालली होती.

अनेकांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती नाही. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये त्याबद्दल माहिती देणार आहोत. जयदीप म्हणजेच मंदार जाधव याचे 2016 मध्ये लग्न झाले आहे. त्याने एका हिंदी अभिनेत्री सोबत लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव मितिका शर्मा असे आहे. तिने देखील अनेक मालिकांतून काम केलेले आहे.

तिने काम केलेली देवो के देव महादेव ही मालिका चांगलीच गाजली होती. तर सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये गौरीची भूमिका देखील लोकप्रिय होताना दिसत आहे. गौरीच्या भूमिकेमध्ये आपल्याला गिरीजा प्रभू ही अभिनेत्री दिसली आहे. गौरी हिचा मालिकेमध्ये नुकताच अपघात झाला आहे. तिला वाचवण्यासाठी आता सर्वजण प्रयत्न करताना दिसणार आहेत.

तर मालिकेमध्ये माधवी निमकर देखील आपल्याला दिसली आहे. माधवी निमकरची भूमिका देखील खूप लोकप्रिय झाली आहे. माधवी निमकर हिने या मालिकेमध्ये शालिनी वहिनी ही भूमिका साकारली आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत, तर वर्षा उसगावकर यांनी देखील अफलातून असे काम या मालिकेमध्ये केलेले आहे.

मीनाक्षी राठोड ही देखील या मालिकेमध्ये दिसली आहे. मात्र, मध्यंतरी ती गरोदर राहिल्याने मालिकेच्या बाहेर पडली आहे. तर आता मालिकेमध्ये आपल्याला वेगळे वळण पाहायला मिळणार आहे. गौरीचा अपघात झाल्याने जयदीप आता महालक्ष्मीला साकडं घालणार आहे.

नवरात्रीनिमित्त या विशेष भागाचे प्रदर्शन लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे या भागाचे चित्रीकरण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातच करण्यात आले आहे. जयदीप याने महालक्ष्मीच्या मंदिरातच याचे चित्रीकरण केले आहे आणि आता जयदीप याला महालक्ष्मी दर्शन देणार आहे, तर या महालक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्याला एक अभिनेत्री दिसणार आहे.

या अभिनेत्रीचे नाव निशा परुळेकर असे आहे. महेश कोठारे यांनी नुकताच याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे महालक्ष्मीच्या भूमिकेमध्ये निशा परळीकर ही जयदीप याला प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नंतर गौरी ही बरी होते, असे आता मालिकेत दाखवण्यात येणार असल्याचे समजते.

Team Hou De Viral