निवेदिता सराफ यांनी दिली ‘खुशखबर’, दिसणार नव्या मालिकेत

निवेदिता सराफ यांनी दिली ‘खुशखबर’, दिसणार नव्या मालिकेत

निवेदिता सराफ जोशी या मराठी चित्रपट सृष्टी मधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात मालिकेत देखील काम केले आहे. गेल्या काही वर्षापासून त्या छोट्या पडद्यावर दिसत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची आलेली अग बाई सासुबाई ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

या मालिकेमध्ये त्यांनी आसावरीची भूमिका साकारली होती, तर या मालिकेमध्ये आपल्या शुभ्रा देखील दिसली होती. शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अतिशय जबरदस्त साकारली होती, तर या मालिकेमध्ये आपल्याला बबड्या हादेखील दिसला. बबड्या ही भूमिका देखील लोकप्रिय झाली होती. ही भूमिका आशुतोष पत्की या अभिनेत्याने सारली होती.

या मालिकेनंतर आशुतोष आणि तेजश्री यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा देखील होती. मात्र या दोघांनीही वेळोवेळी नकार दिला. निवेदिता सराफ यांनी या मालिकेमध्ये अतिशय छान भूमिका केली. या मालिकेच्या यशानंतर दिग्दर्शकांनी अगंबाई सूनबाई ही मालिका सुरू केली. मात्र, या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान ही दिसली नाही.

पर्यायाने ही मालिका काही महिन्यातच बंद पडली. त्यामुळे निवेदिता सराफ यांचा हा निर्णय चुकला. असेच म्हणावे लागेल. निवेदिता सराफ यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. विशेष करून अशोक सराफ, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांची जोडी ही लोकप्रिय ठरली होती. अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली होती.

त्यानंतर महेश कोठारे यांच्यासोबत थरथराट या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटातही त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटात काम करून महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले आहे. आता छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसापासून त्या सक्रिय असतात.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच आपल्या वेगवेगळ्या रेसिपी देखील त्या शेअर करत असतात. या वयातही निवेदिता सराफ या ॲक्टिव आहेत. त्यामुळे त्यांचे अनेकांना कौतुक वाटते. आता देखील त्यांनी एक मालिका स्वीकारली असून ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे.

होय आपण ऐकले‌ते खरे आहे. चार एप्रिलपासून कलर्स मराठी या वाहिनीवर ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचे नाव ‘भाग्य दिले तू मला’ असे आहे. या मालिकेत आपल्याला विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले हे अभिनेते व अभिनेत्री दिसणार आहेत. सध्या कलर्स मराठी वर असलेली तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका आता बदलली जाणार आहे आणि त्या मालिकेच्या जागी भाग्य दिले तू मला ही मालिका दिसणार आहे.

तन्वी आणि विवेक यांची जोडी आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का किंवा निवेदिता सराफ याच मालिकेत भाव खाऊन जाणार हे आपल्या लवकरच कळणार आहे.

Team Hou De Viral