‘निवेदिता सराफ’ यांच्या बहिणीला पाहिलंत का ? त्या देखील आहेत दिग्गज अभिनेत्री…

‘निवेदिता सराफ’ यांच्या बहिणीला पाहिलंत का ? त्या देखील आहेत दिग्गज अभिनेत्री…

निवेदिता सराफ जोशी या मराठी चित्रपट सृष्टीतील याच आघाडीच्या अभिनेत्री आहेत. निवेदिता सराव यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. विशेष करून अशोक सराफ यांच्यासोबतची त्यांची जोडी लोकप्रिय ठरली होती.

अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या आवडीची भूमिका आहे. निवेदिता सराफ या महेश कोठारे यांच्यासोबत अनेक चित्रपटात दिसल्या आहेत. निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले.

अशोक सराफ यांचे निवेदिता सराफ यांच्या आधी देखील रंजना देशमुख हिच्या सोबत प्रेम प्रकरण असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर त्यांचे नाते हे संपुष्टात आले. आता निवेदिता सराफ यांच्या बाबतीतली एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना एक बहीण असून त्यांचे नाव मीनल परांजपे असे आहे. 1990 मध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ज्यावेळेस लग्न केले होते, त्यावेळेस मीनल परांजपे यांनी पुढाकार घेतला होता. मीनल परांजपे यादेखील नाटक आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत. मात्र अनेकांना याबाबत माहिती नसेल.

मीनल परांजपे यांनी अरण्यक या नाटकामधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांचे हे नाटक प्रचंड गाजले होते. त्यानंतरही त्यांनी काही नाटक आणि मालिकात काम केले आहे. या नाटकामध्ये मीनल परांजपे यांनी कुंती ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 2019 मध्ये झालेल्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

त्यानंतर त्यांचे कौतुक खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. 2001 मध्ये आलेल्या अमोल पालेकर यांच्या ध्यास पर्व या चित्रपटामध्ये देखील त्यांनी अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. बहिणींची जोडी आवडली का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral