स्टेजवर गाणे गात असताना ‘या’ प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

गेल्या काही दिवसापासून मनोरंजन क्षेत्राला अनेक धक्के बसत असल्याचे समोर येत आहे. आणि कलाकार हे आपल्याला सोडून गेल्याचे आपण पाहत आहोत. गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यानंतर अलीकडेच प्रसिद्ध गायक के के याचा देखील मृत्यू झाला.
एका कार्यक्रमामध्ये गाणे गात असताना त्याला श्वास घेण्यास खूप त्रास झाला होता. त्यानंतर त्याने तातडीने ती जागा सोडली आणि हॉटेलमध्ये गेला. मात्र, त्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अलीकडेच प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. राजू श्रीवास्तव हे जिममध्ये वर्कआउट करत होते.
जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्बल 56 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मलावली. आता देखील एका ज्येष्ठ कलावंताचे स्टेजवरच हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचे समोर आले आहे.
गाणे गात असताना अचानक स्टेजवर हृदयविकाराचा झटका येऊन मुरली प्रसाद मोहपात्रा यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. मुरली प्रसाद मोहपात्रा हे जयपूर मधील एका शहरामध्ये दुर्गाष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त गाणी गात होते. दोन गाणे गायल्यानंतर त्यांना अचानक छातीत दुखायला लागले. त्यानंतर ते खाली कोसळले. उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी याकडे दुर्लक्ष केले.
मात्र, काही जणांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात देण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अधिक तपासण्या केल्या. त्यानंतर त्यांना मृत घोषित केले. मुरली प्रसाद मोहपात्रा हे अतिशय लोकप्रिय गायक होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निर्णयानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.