लहान पडद्यावरील आणखी ‘एका’ प्रसिद्ध कलाकाराचे निधन, योगीजींनी केली होती मदत

लहान पडद्यावरील आणखी ‘एका’ प्रसिद्ध कलाकाराचे निधन, योगीजींनी केली होती मदत

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्के बसत आहेत. दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर अभिनेते, रमेश देव यांच्या यांच्यानंतर काही कलाकारांचे निधन झाल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले.

आता देखील बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते यांचे निधन झाले आहे़, हे अभिनेते छोट्या पडद्यावर कायमच चर्चेत होते. त्यांनी अनेक चित्रपटातही काम केलेले आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिका त्यांच्यासारख्या कोणीच केल्या नाहीत. गेल्या काही दिवसापासून ते प्रतिज्ञा या मालिकेमध्ये सज्जन सिंह यांच्या भूमिकेत आपल्या दिसत होते.

होय आपण ऐकले ते एकदम खरे आहे. या अभिनेत्याचे नाव अनुपम श्याम ओझा असे आहे. अनुपम यांचे वयाच्या 63 व्या वर्षी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मात्र सोशल मीडियावर याबाबत अधिक चर्चा झाली नाही हे देखील विशेष आहे. मागच्या वेळेस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांची प्रकृतीही चांगली होती, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता त्यांचे निधन झाले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. एका महान अभिनेत्याला आपण गमावले आहे.

अनुपम श्याम यांच्या निधनाबद्दल आपल्याला खूपच शॉक आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना आहे, असेही त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी बॉलिवूडमध्ये मदतीची याचना देखील केली होती. मात्र, त्यांना जास्त मदत मिळाली नाही. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हे पुढे आले आणि त्यांच्या उपकाराची पूर्ण जबाबदारी उचलली.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. एकदा डायलिसिस घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा कामावर आले होते. मल्टिपल ऑर्गन फेल झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 2008 मध्ये आलेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात अनुपम यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते.

त्याशिवाय त्यांनी काही आंतरराष्ट्रीय चित्रपटातही काम केले. बँडिट क्वीन मध्ये त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. अनुपम श्याम फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील आपल्या भूमिकेने ओळखले जात होते. आता त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्याला अनुपम हे आवडत होते का? त्यांना श्रद्धांजली वाहायची असल्यास कमेंट करा.

Team Hou De Viral