पालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश

पालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश

लहान मुलांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शिअम या घटकांचा समावेश करणं गरजेचं असतं. हे पदार्थ पालेभाज्या, कडधान्य या सारख्या पदार्थांमधून मिळत असतात. मात्र आजकालच्या लहान मुलांना पालेभाज्याचं वावडं असल्याचं पाहायला मिळतं. परंतु पालेभाजीचं आपल्या आहारामध्ये महत्त्वाचं स्थान आहे.

शरीराच्या वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत. या पालेभाज्यांमध्ये आवर्जुन खावी अशी भाजी म्हणजे पालक. पालक केवळ एक भाजीच नाही तर तिचे औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे –

१. आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात.

२. पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो.

३. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.

४. अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral