या अभिनेत्रीचं ८ वर्षांचं रिलेशनशिप तुटलं, आत्ता झळकणार बिग बॉस मध्ये

या अभिनेत्रीचं ८ वर्षांचं रिलेशनशिप तुटलं, आत्ता झळकणार बिग बॉस मध्ये

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आता ब्रेकअप हा ट्रेण्ड गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.अशाच एका अभिनेत्रीचे प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासोबत ब्रेक-अप झाले आहे. आता ती आठ वर्षापासूनचे संबंध तोडून एकटीच राहत आहे, तर अनिकेत विश्वासराव याने प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा चव्हाणच्या सोबत लग्न केले आहे.

आता ही अभिनेत्री बिग बॉस मध्ये देखील दिसणार असे सांगण्यात येते. कलर्स मराठी वर 19 सप्टेंबर रोजी मराठी बिग बॉस 3 हा भाग सुरू होणार आहे. याबाबतचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर या बिग बॉस थ्री चे सूत्रसंचालन करणार आहेत. महेश मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त होते.

मात्र, शस्त्रक्रिया केल्यानंतर आता ते बरे झाले असून ते लवकरच या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉस मराठी 3 या भागामध्ये अनेक कलाकार सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री निशिगंधा वाढ या देखील या शो साठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता त्यांच नाव निश्चित झाली की नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

19 सप्टेंबरच्या आधी या शो मधे कोण कोण सहभागी होणार आहे, हे स्पष्ट होईल. असे असले तरी यामध्ये अनेक मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदी बिग बॉस धर्तीवरच मराठी बिग बॉसची निर्मिती करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत दोन भाग प्रसारित झालेले आहेत. दोन भागांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुन्हा आता बिग बॉस थ्रीचे सेशन देखील होणार आहे.

या शोच्या माध्यमातून अभिनेत्री रेशम टिपणीस हिचे देखील प्रेम प्रकरण नंतर समोर आले होते. प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव हा काही वर्षांपूर्वी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे प्रेमसंबंध जवळपास आठ वर्षांपर्यंत चालले. पल्लवी सुभाषने चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत काम केले होते. या मालिकेमध्ये तिचे खूपच कौतुक झाले होते.

त्यानंतर तिने गोदभराई, बसेरा, तुम्हारी दिशा यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. ती हिंदी मालिकांमध्ये खूप प्रसिद्ध अशी आहे. त्यामुळे आता मराठी बिग बॉस तिसऱ्या पर्वामध्ये पल्लवी सुभाष ही दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता 19 तारखेचा हा शो सुरू झाल्यानंतर याबाबत स्पष्टता होईल.

Team Hou De Viral