पांढऱ्या साडीमुळे लता मंगेशकरांची उडवली जायची खिल्ली, रागात गायिकेने घेतलेला निर्णय

पांढऱ्या साडीमुळे लता मंगेशकरांची उडवली जायची खिल्ली, रागात गायिकेने घेतलेला निर्णय

लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. मृत्युसमयी लता 93 वर्षाच्या होत्या. लता मंगेशकर यांच्या बाबतीत अनेक बातम्या आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मृत्यूनंतरही त्यांना प्रसिद्धीही अफाट मिळत आहे, असे देखील आता दिसत आहे.

लता मंगेशकर यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांना पांढऱ्या साड्या खूप आवडायच्या. लता मंगेशकर या अतिशय शालीन होत्या. त्यामुळे पूर्ण अंगभर कपडे घालायच्या, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मात्र, एका संगीत दिग्दर्शकाने त्यांना पांढऱ्या साडीवरून टोमणा मारला होता. त्यामुळे त्या खूपच संतापल्या होत्या. याबद्दलचा आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.

लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास 50000 गाणे म्हणले आहेत. सहा दशकांमध्ये त्यांनी सहा पिढ्यांच्या अभिनेञींना आवाज दिला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर अनेक आघोरी प्रकार देखील करण्यात आले होते. त्यांना अन्नात विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याची चर्चा त्यावेळेस होती.

मात्र, एका संगीत दिग्दर्शकाने लता मंगेशकर यांच्या विषयी अपशब्द आणि टोमणे मारले होते. त्यावेळेस लता मंगेशकर यांनी अतिशय जबरदस्त निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचा हा निर्णय देखील त्या वेळेस प्रचंड चर्चेत आला होता. लता मंगेशकर या अतिशय लाजाळू आणि नम्र स्वभावाच्या होत्या. त्या अनेकांसोबत लवकर मोकळ्या व्हायचा नाही.

लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ‘चांदनी रात’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रपटामध्ये सायराबानूच्या आईचे नाव नसीमा बानू होते. या चित्रपटात लता मंगेशकर यांना जीएम दुरानी यांच्यासोबत एका गाण्याचे रेकॉर्डिंग करायचे होते. मात्र, लता मंगेशकर या गाण्याचा रेकॉर्डिंगसाठी पोहोचल्या.

मात्र, त्या गाण रेकॉर्ड न करता परत आल्या. याचे कारण देखील अतिशय मजेशीर असे आहे. जीएम दुर्रानी हे लता मंगेशकर यांना कायम टोमणे मारत असल्याचे सांगण्यात येते. लता मंगेशकर यांना ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती.

ज्या वेळेस लता मंगेशकर या रेकॉर्डिंगसाठी पोहोचल्या त्यावेळेस दुर्रानी यांनी लता मंगेशकर यांची चेष्टा करायला सुरुवात केली‌. दुरानी हे लता मंगेशकर यांना टोमणे मारत होते, तर दुसरीकडे लता मंगेशकर या शांत बसून होत्या. या गाण्याचे रेकॉर्डिंगसाठी लता मंगेशकर पोहोचल्या.

त्यावेळेस जीएम दुर्रानी लता मंगेशकर यांना पाहून गळ्यात काय घालून आली आहेस, असे त्यांनी विचारले. त्यानंतर लता मंगेशकर यांनी सांगितले की, हा हस्तीदंताचा हार आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी आणला. तो मला खूप प्रिय आहे. त्यावर दुर्राणी यांनी लता मंगेशकर यांना सोन्याचे दागिने घालण्याच्या सूचना केल्या.

तसेच पुढे म्हणाले की, तू रंगीबेरंगी कपडे का घरात नाही? पांढरी साडी साडी घालते हे अतिशय विचित्र दिसते, असे त्यांनी म्हटले. लता मंगेशकर यांना दुराणी यांचे बोलणे अतिशय खटकले होते. त्या काळामध्ये जीएम दुर्रानी यांचा खूप मोठा थाट होता, असे असले तरी लता मंगेशकर यांना दुरानींचे बोलणे अजिबात आवडले नव्हते. त्यानंतर त्यांनी दुरानी यांच्यासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र लता मंगेशकर यांच्यासाठी हा अतिशय अवघड निर्णय होता. कारण की त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात होती. मात्र, लता मंगेशकर यांनी पुढे जाऊन प्रचंड नाव कमावले. काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जीएम दुर्रानी ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होते, ते मला अजिबात आवडले नव्हते.

त्यामुळे मी भविष्यात त्यांच्यासोबत कधीही गाणे गायले नाहीत. लता मंगेशकर यांचा स्वभाव अतिशय लाजाळू होता. मात्र, त्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर त्या ठाम राहिल्या.

Ambadas