रात्रीस खेळ चाले या मालिकेतील पांडूची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूपच छान, पहा फोटो

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील पांडूची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूपच छान, पहा फोटो

झी मराठीवर प्रदर्शित होणारी मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे.जणू लोकांनी या मालिकेला डोक्यावरच घेतलं आहे. या मालिकेत दिसणारे पात्र अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.

भारतात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही मालिकांचे शूटिंग हे चालू नाहीये. आणि म्हणून जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेचा पहिला सिझन सध्या प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडू मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडूची भूमिका पाहायला मिळत आहे. हा पांडू खुळा असून प्रत्येक गोष्ट विसरतो आणि इसरलो… असे म्हणत त्याची कबुली देखील देतो. त्यामुळे हा भोळा पांडू प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूची भूमिका कुरतडकरने साकारली आहे.

प्रल्हाद हा एक उत्तम अभिनेता आहे हे आपल्याला रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दोन्ही सिझनमधल्या अभिनया वरून लक्षात आलेच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, हा प्रल्हाद हा खूप चांगला कलाकार असण्यासोबतच त्याच्यात आणखी एक खुबी आहे.

प्रल्हाद खूप चांगले लेखन करत असून तोच या मालिकेचा लेखक आहे. त्याने या शिवाय देखील काही मालिकांचे लेखन केले आहे. प्रल्हादने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकांसाठी पारितोषिकं देखील मिळवली आहेत.

प्रल्हादचे लग्न अंजली कानडेसोबत मे २०१७ मध्ये झाले असून अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पाहायला मिळतात. त्याचसोबत त्यांच्या लग्नाच्यावेळेसचा फोटो अभिनेता सुयश टिळकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमात देखील ते दोघे झळकले होते.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral