बिगबॉसच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘बिगबॉस’ मध्ये जाण्याआधीच या स्पर्धकाला आला पॅनिक अटॅक

बिगबॉसच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘बिगबॉस’ मध्ये जाण्याआधीच या स्पर्धकाला आला पॅनिक अटॅक

सध्या कलर्स मराठी या वाहिनीवर 19 सप्टेंबरपासून मराठी बिग बॉस चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये अनेक कलाकार सहभागी झालेले आहेत. यामध्ये आपल्याला स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर ही घटस्फोटित जोडी देखील दिसताहेत. याचबरोबर भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई देखील या शोमध्ये सहभागी झालेल्या आहेत.

तसेच या शोमध्ये आश्चर्यकारकरित्या कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील हीदेखील दिसत आहे. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका करून तिला ट्रोल देखील केले आहे. याप्रमाणे या शोमध्ये डॉक्टर उत्कर्ष शिंदे, कोकणी गायक दादुस, जय दुधाने, सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथन यासारखे कलाकार देखील दिसत आहेत.

मराठी बिग बॉस हा खऱ्या अर्थाने हिंदी बिग बॉस वरून घेतलेला शो आहे. आता हिंदी बिग बॉसची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा करत असतो. सलमान खान याने आजवर अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

त्याचबरोबर सलमान खान याचे सगळेच चित्रपट शंभर कोटीचा गल्ला जमवतात, असाही बॉलीवूडमध्ये ट्रेंड आहे. गेल्या काही वर्षापासून सलमान खान हा हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन करत असतो. हा बिग बॉस त्याचा शो प्रचंड लोकप्रिय होत आहे. आता बिग बॉस 15 देखील लवकर सुरू होणार आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.

मात्र, एक स्पर्धक अशी होती की, जी सहभागी होण्याच्या आधीच हा शो सोडून निघून गेली आहे. या स्पर्धकाचे नाव पंजाबी गायक अफसाना खान असे आहे. ती बिग बॉस शो मध्ये दिसणार होती. मात्र, तिने हा शो सोडला आहे. अफसाना खान हिने बिग बॉस 15 चा प्रोमो शूट केला होता. काही काळ तिला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

अफसाना खान तिच्या ‘यार मेरा तितलीयन वर्गा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. अफसाना खानचं हे गाणे खूप आवडलं. अफसाना खान या शोमध्ये सहभागी होण्याच्या आधी खूप तणावात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे ज्या दिवशी प्रत्यक्षात शो मध्ये सहभागी होण्याची वेळ येणार होती, त्याच्या आधीच अफसाना खान हिला पॅनिक अटॅक आला.

त्यावेळेस तिला बिग बॉसच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या. त्यानंतर ती बरी झाली. मात्र, ती खूपच तणावात होती. त्यामुळे तिने हा शो न करण्याचे ठरवले. त्यामुळे ती हा शो न करताच आपल्या घरी परतली आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत.

Team Hou De Viral