परिणीती चोप्राने सुशांतसोबत काम करण्यात दिला होता नकार; कारण ऐकून व्हाल थक्क!

परिणीती चोप्राने सुशांतसोबत काम करण्यात दिला होता नकार; कारण ऐकून व्हाल थक्क!

दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकतीच दिलेली एक मुलाखत फार चर्चेत आहे. कारण या मुलाखतीत त्याने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांबाबत आश्चर्यकारक खुलासे केले आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्राने ‘हसी तो फसी’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत काम करण्यास नकार दिल्याचं अनुरागने या मुलाखतीत सांगितलं. त्याचसोबत अनुराग सुशांतसोबत काम का करू शकला नव्हता यामागचं कारणसुद्धा त्याने स्पष्ट केलं.

पत्रकार फाये डिसूझाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “मी एका टेलिव्हिजन अभिनेत्यासोबत काम करणार नाही असं सांगत परिणीतीने हसी तो फसी चित्रपटात सुशांतसोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यावेळी सुशांत कोण आहे, तो काई पो चे, पीके यांसारख्या चित्रपटात काम करणार आहे आणि जोपर्यंत हसी तो फसी प्रदर्शित होईल तोपर्यंत तो फक्त टेलिव्हिजन अभिनेता राहणार नाही असं तिला समजावलं.

पण त्यावेळी तिच्याकडे यशराज फिल्म्सचा शुद्ध देसी रोमान्स चित्रपटसुद्धा होता. तिने कदाचित यशराज फिल्म्सला सुशांतबद्दल सांगितलं असावं. त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला शुद्ध देसी रोमान्स चित्रपट करण्याबाबत विचारलं होतं. यशराज बॅनरसोबत काम करणं कधीही उत्तम असेल असा विचार करत त्याने आमच्याकडे पाठ फिरवली.

सुशांतने पुन्हा कधीच आम्हाला उत्तर दिलं नाही की तो हसी तो फसी चित्रपटात काम करणार की नाही. तो अचानक गायब झाला.”सुशांतला ‘हसी तो फसी’ चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्याने यशराज फिल्म्ससोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अनुरागने सांगितलं.

नंतर परिणीतीने ‘हसी तो फसी’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केलं. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

Team Hou De Viral