भारतीय क्रिकेटपटू ‘पार्थिव पटेल’चे परिवारा सोबतचे सुंदर फोटो

पार्थिव पटेलने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा तो खुपचं लहान मुलासारखा दिसत होता. पुढे संघाला धोनीसारखा चांगला यष्टिरक्षक मिळाल्याने पार्थिव पटेलला फारशी संधी मिळाली नाही. आज आम्ही त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत आहोत.खरेतर, वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पण करणारा पार्थिव पटेल हा सर्वात तरुण यष्टिरक्षक आहे. त्याच्या विकेटकीपिंग आणि खेळात कमतरता नव्हती पण महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षक म्हणून आल्यानंतर पार्थिव पटेल मार्गस्थ झाला.पार्थिव पटेलने 25 कसोटीत 934 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये 736 धावा केल्या आहेत. यात त्याच्या चार अर्धशतकांचा समावेश आहे. पार्थिव पटेलने 2008 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण अवनी झवेरीशी लग्न केले.
23 व्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे लग्न झाले होते. अवनी व्यवसायाने वेडिंग डिझायनर आहे. अवनी सांगते की तिने तिच्या लग्नाचा ड्रेस देखील स्वतःच डिझाइन केला होता.