‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील पश्या अंजी नाही तर या लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात, लवकरच करणार लग्न

स्टार प्रवाह वहिनी वर सुरू असलेली सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत.
या मालिकेमध्ये आपल्याला सुनील बर्वे हे एका वेगळ्या आगळ्या भूमिकेत पाहताना दिसत आहेत, तर या मालिकेमध्ये इतरही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मध्यंतरी या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर हा वाद शमला आहे. या मालिकेमध्ये साक्षी गांधी हिने अवनीची भूमिका साकारली आहे.
तर आकाश नलावडे, सुनील बर्वे, अमेय बर्वे, नंदिता धुरी पाटकर, किशोरी अंबिये, आकाश शिंदे, सायली संमोहरे, भूषण पाटील यासारख्या कलाकारांच्या भूमिका देखील दिसत आहेत. तर अलीकडेच या मालिकेमध्ये योगा टीचर म्हणून पूजा पुरंदरे हिने आपली भूमिका योग्य प्रकारे साकारली होती.
याच मालिकेमध्ये काम करणाऱ्या अन्नपूर्णा विठ्ठल यांनी ही मालिका सोडताना या मालिकेत काम करणारे सुनील बर्वे किशोरी आंबिये यांच्यासह मालिकेच्या दिग्दर्शकावर देखील मोठे आरोप लावले होते. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये आपल्याला पश्याची भूमिका दिसलेली आहे. पैशाची भूमिका अभिनेता आकाश नलावडे याने साकारली आहे. त्याची ही भूमिका फारच लोकप्रिय ठरलेली आहे.
पश्या म्हणजे आकाश नलावडे आता लवकरच लग्न बंधन अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाश नलावडे याने काही दिवसापूर्वी रुचिका धुरीच्यासोबत साखरपुडा केला होता. आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर सध्या शेअर होताना दिसत आहेत. आकाश नलावडे हा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चहात्यांशी संवाद साधत असतो. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नी सोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यामुळे आता आकाश नलावडे आणि रुचिका धुरी हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.