‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; १० दिवसात केली तब्बल इतक्या कोटींची कमाई

‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; १० दिवसात केली तब्बल इतक्या कोटींची कमाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची आणखी एक गाथा मोठ्या पडद्यावर 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाली आहे. शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वर आधारित असलेल्या या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

आता आपल्याला या चित्रपटाचे नाव समजलेच असेल. होय आम्ही बोलत आहोत पावनखिंड या चित्रपटाबद्दल. पावनखिंड हा चित्रपट 18 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाला. त्याच वेळेस या चित्रपटाची चर्चा देखील सुरू झाली होती. कारण या चित्रपटाने तब्बल पंधराशे स्क्रीन घेतल्या होत्या. त्याचे दुसरे कारण असे की, या चित्रपटात समोर मोठा चित्रपट दुसरा नव्हता.

तसेच हिंदीमधील काही चित्रपट होते. मात्र, नुकतीच शिवजयंती होणार असल्याने या चित्रपटाची क्रेज ही खूप वाढली. आणखीन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई करत आहे. पावनखिंड या चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अजय पुरकर यांनी शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.

मृणाल कुलकर्णी या देखील अतिशय कसदार पणे चित्रपटात जिजाऊंच्या भूमिकेत वावरताना दिसतात. त्याचप्रमाणे समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे. पावनखिंडीत शत्रूंना अडवून ठेवल्याची शौर्यगाथा हे सगळे मराठीजन तसेच देशात देखील अनेक जण जाणतातच.

आतापर्यंत पावनखिंड या धर्तीवरच एखादा चित्रपट निर्माण झाला नव्हता. अनेक चित्रपटात शौर्य कथा दाखवण्यात आल्या. मात्र बाजीप्रभुंवर चित्रपट येण्याची ही पहिलीच वेळ असे म्हणावे लागेल. दिग्पाल लांजेकर यांनी हा ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे. लांजेकर यांनी याआधी फत्तेशिखस्त, फर्जंद यासाठी चित्रपट केले होते.

या दोन्ही चित्रपटाचे वैशिष्ट्य असे होते की, प्रत्यक्षात गड किल्ल्यावर जाऊन या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. पावनखिंड या चित्रपटात देखील लांजेकर यांनी हाच पायंडा ठेवला आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात आणखीन कोट्यवधी रुपयांची कमाई करेल, असे सांगण्यात येत आहे.

चित्रपट समीक्षक व बॉक्स ऑफिस रिव्यू करणारी हिंदीतील दिग्गज तरण आदर्श यांनी पावनखिंड चित्रपटाच्या कमाईचे एक ट्विट केले आहे. त्यावर दिग्पाल लांजेकर यांनी देखील हर हर महादेव म्हटले आहे. पावनखिंड चित्रपटाने दुसर्‍या आठवड्यात आपली घोडदौड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 12 कोटी 17 लाख रुपयांचा व्यवसाय केला होता.

त्याचप्रमाणे आठवड्याच्या शेवटी एक कोटी वीस लाख रुपये कमाई या चित्रपटाने केली. शनिवारी एक कोटी 55 लाख अशी एकूण आत्तापर्यंत 16 कोटी 71 लाख रुपये कमाई केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये हा एक विक्रमच म्हणावा लागेल. दिग्पाल यांनी तरण आदर्श यांचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Team Hou De Viral