‘लग्नाची बेडी’ या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले

‘लग्नाची बेडी’ या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले

लग्नाची बेडी या मालिकेत सध्या मधू हिचे पात्र हे प्रचंड गाजत आहे. इतर भूमिका देखील या मालिकेत चांगल्या प्रकारे जमलेल्या आहेत. या मालिकेत सिंधूची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सिंधूची भूमिका ही देखील लोकप्रिय झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री सायली देवधर हिने केली आहे.

सायली देवधर ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने याआधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. जुळून येती रेशिम गाठी या मालिकेतील सायली आपल्याला दिसली होती. सायलीने 2020 च्या सुमारास लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव गौरव बुरसे असे आहे.

गौरव हा देखील मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहे. हे दोघे देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याचप्रमाणे या मालिकेत मधुची भूमिका साकारणारी रेवती लेले ही देखील सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांची नेहमी संपर्कात असते. लग्नाची बेडी ही मालिका गुम है किसी के प्यार मैं या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

हिंदीमध्ये ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर या मालिकेचा आता मराठीमध्ये देखील रिमेक करण्यात आला आहे. मराठीमध्ये ही मालिका प्रेक्षकांना सध्या तरी आवडत आहे. काही मालिका या खूप रटाळ झाल्या की प्रेक्षक आपोआपच दुसऱ्या मालिकांकडे वळतात आणि निर्माते आणि दिग्दर्शक देखील त्याप्रमाणे दुसरी मालिका देखील सुरू करतात.

आता स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा हिरमोड करताना दिसत आहे. त्यामुळे ही मालिका आता बंद करा, अशी मागणी देखील प्रेक्षक करत आहेत. मात्र, तरीदेखील ओढून ताणून ही मालिका निर्माते, दिग्दर्शक, लेखिका सुरूच ठेवत आहेत. त्याचप्रमाणे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील आता ओढून ताणून सुरू आहे.

तर आता सध्या लग्नाची बेडी मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र, या मालिकेवरही प्रेक्षक हे भडकले असल्याचे दिसत आहेत. आता लग्नाची बेडी मालिकेवरून प्रेक्षक नाराज झाले आहेत आणि त्यांनी कमेंट करायला सुरू केली आहे. ही मालिका तातडीने बंद केली पाहिजे. या मालिकेमध्ये तोच तोच पणा दाखवण्यात येतो.

मालिकेमध्ये नवीन विषय काहीच नसते. कधीतरी सिंधू आणि राघव यांचे प्रेम दाखवायला पाहिजे. मात्र, मालिकेमध्ये नुसती कटकट दाखवण्यात येते. कधीतरी मालिकेमध्ये प्रेमाचा ओलावा दाखवण्यात यावा, अशी अपेक्षा देखील प्रेक्षकांनी केली आहे, तर आपण ही मालिका पाहता का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral