पित्ताचा त्रास होत असल्यास हे काही घरगुती उपाय.. ताबडतोब थांबेल पित्त…

पित्ताचा त्रास होत असल्यास हे काही घरगुती उपाय.. ताबडतोब थांबेल पित्त…

सध्याच्या धावपळीच्या जमान्यात मध्ये अनेकांना पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. याचे कारण देखील तसेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नवरा आणि बायको दोघांनाही नोकरी करावी लागते. त्यामुळे घरातील जेवण बनत नाही. अशावेळी दोघांनाही बाहेरचे खावे लागते. यामध्ये समोसा, कचोरी, फरसाण आणि तेलकट-तुपकट पदार्थ मोठ्या प्रमाणात समावेश होतो.

त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांची झोप देखील होत नाही. त्यामुळे सहाजिकच आठ तास झोप न झाल्यामुळे पित्ताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे आपले पित्त नियंत्रण ठेवण्यासाठी आपण घरगुती उपाय करूनही यावर मात करू शकता. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये घरगुती उपाय सांगणार आहोत.

1) केळी – जर आपल्याला पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असेल तर आपण केळीचे सेवन करावे. केळीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे ऍसिड मंदावते आणि पचन क्रिया सुधारते. तसेच केळीमध्ये फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. पित्ताचा त्रास होत असल्यास केळीचे सेवन करावे. यामुळे शौच सुलभ होऊन आपला पित्ताचा त्रास कमी होतो.

2) तुळस – प्रत्येकाच्या घरांमध्ये तुळस ही असतेच असते. तुळशीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाढण्यात मदत देखील होते. तसेच याचे आयुर्वेदिक उपयोग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जर आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल तर दररोज तुळशीचे पाच पाने खावी. तुळशीच्या पानांमध्ये अँटी अल्सर घटक असतात. त्यामुळे तुमचा पित्ताचा त्रास हा कमी होऊ शकतो.

3) बडीशेप – जेवण झाल्यानंतर आपण अनेकदा बडीशेप ही खातच असतो. याचे कारण असते की पित्त नियंत्रणात राहून अन्नाचे पचन व्हावे, तर आपल्याl पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असेल तर आपण बडीशेपचे सेवन करावे. यामुळे अन्न पचन होऊन पित्त नियंत्रणात येऊ शकते.

4) जिऱ्याचे पाणी – जर आपल्या पित्ताचा त्रास होत असेल तर आपण घरगुती उपाय देखील करू शकता. प्रत्येकाच्या घरात जिरे हा पदार्थ असतो. जिरे आणि पाणी एकत्रित करून हे मिश्रण उकळायला ठेवावे आणि त्याचे पाणी प्यावे. यामुळे आपले पित्त नियंत्रणात राहते. तसेच हा उपाय दररोज करावा. यामुळे आपल्याला नक्कीच फरक पडेल.

जर आपल्याला पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असेल आणि आपण पित्त रोज बाहेर काढत असाल तर असे करू नका. यामुळे तुमच्या आतड्यांना इजा होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण उपाय करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral