Pm मोदी आणि ट्रम्प सोबत ‘सेल्फी’ घेत रातोंरात स्टार झाला हा मुलगा, जाणून घ्या कोण आहे तो मुलगा नक्की?

जर तुम्हाला कोणी जगातील दोन सर्वात सामर्थ्यवान व्यक्तींसह सेल्फी घेण्यास सांगितले तर ते नक्कीच तुमच्यासाठी कठीण असा टास्क असेल. परंतु जर आम्ही असे म्हटले की हे काम 9 वर्षांच्या मुलाने केले आहे?माघील 2 ते 3 दिवसांत इंटरनेटवर एक सेल्फी खूप व्हायरल होत आहे. या स्लेफीमध्ये एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. व 9 वर्षाचा मुलगा त्यांच्यामध्ये स्मित करत त्यांच्या सोबत सेल्फी घेत उभा आहे.मोदी आणि ट्रम्प यांच्याबरोबर सेल्फी घेतल्यामुळे हा मुलगा स्टार बनला आहे. इतकेच नाही तर स्वत: नरेंद्र मोदींनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर आता प्रश्न पडतो की हा मुलगा नेमका कोण आहे ? इतक्या सहजपणे मोदी आणि ट्रम्प यांच्याबरोबर त्याने सेल्फी कशी घेतली ? आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.
अश्या प्रकारे घेतली सेल्फी
आपणा सर्वांना माहितच आहे की, मोदी जी आजकाल अमेरिकेत आहेत आणि ते ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात गेले आहेत. येथे मोदीजींनी तेच व्यासपीठ डोनाल्ड ट्रम्पबरोबर शेअर केले आहे.जेव्हा मोदी अन ट्रम्प मंचाकडे जात असताना काही भारतीय मुलं या दोन नेत्यांच्या स्वागतासाठी वाटेवर उभी होती. हे दोघेही हसत हसत पुढे जात या मुलांशी संवाद साधत होते. या मुलांच्या ओळीत एक 9 वर्षाचा मुलगा देखील शेवटचा क्रमांकावर उभा होता.मुलांना भेटल्यानंतर, मोदीजी पुढे गेले होते आणि त्यांच्या मागे ट्रम्प येत होते. मात्र, ट्रम्प यांनी या मुलाच्या हातात मोबाइल पाहिल्यावर ते थांबले यानंतर मोदीजीही थांबले. तेव्हाच मुलाने मोबाईल बाहेर काढला आणि मस्त सेल्फी काढली.सेल्फी घेतल्यावर मोदीजी या मुलाच्या पाठीवर थाप मारताना दिसले. या पूर्ण घटनेचा व्हिडिओही मोदीजींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
हा मुलगा कोण ?
चला तर आपली उत्सुकता दूर करू या आणि हा मुलगा नेमका कोण आहेत हे जाणून घेऊयात, वास्तविक, या मुलाशी संबंधित काही माहिती विजय कर्नाटक डॉट कॉम या वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे.सात्विक हेगडे असे या 9 वर्षांच्या मुलाचे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर हेगडे आणि आईचे नाव मेधा हेगडे. सात्विक मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील रहिवासी आहे. सात्विकलाही योगात खूप रस आहे.सेल्फी घेण्याच्या दिवशी तो आपला योग क्लास संपवूनच लाइनमध्ये उभा राहिला. इथेच त्या मोदी आणि ट्रम्प यांच्याबरोबर सेल्फी घेण्याची संधी मिळाली.