महाराष्ट्रासाठी वाईट बातमी ! ह्या लोकप्रिय मराठी कलाकाराचे निधन

महाराष्ट्रासाठी वाईट बातमी ! ह्या लोकप्रिय मराठी कलाकाराचे निधन

मराठी मनोरंजन क्षेत्रामधून गेल्या काही दिवसापासून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. अनेक दिग्गज कलाकारांचे निधन देखील झाल्याचे आपण पाहिले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांचे गेले काही दिवसांमध्ये निधन झाले आहे.

काही दिवसापूर्वीच मिथिलेश चतुर्वेदी या ज्येष्ठ अभिनेत्याचे देखील निधन झाले आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील अनेकांना धक्के सध्या बसलेले आहेत. विपुल साळुंखे हा मराठमोळा अभिनेता आपल्याला माहित असेलच. विपुल साळुंखे सध्या मुरंबा या मालिकेमध्ये काम करत आहे. त्याच्या देखील आजीचे नुकतेच निधन झाले होते.

याबाबत त्याने सोशल मीडिया वरून आपल्या चहात्यांना माहिती दिली होती, तर आता देखील एका कवियत्रीचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, ज्याप्रकारे या कवयित्रीचे निधन झाले, त्याचे कारण ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाची जमीन सरकून गेली आहे. तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

प्रसिद्ध कवियत्री व उत्कृष्ट चित्रकार माधुरी गयावळ यांचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय केवळ 58 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आल्यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. एका काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करत असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.

माधुरी गयावळ या आम्ही प्रसिद्ध लेखिका या संस्थेच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या. या वेळी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी काही कवित्रींना कविता वाचनासाठी देखील बोलवले होते. एका कवित्रीने कविता म्हटल्यानंतर पुढच्या कवित्रींना त्या बोलत होत्या. मात्र, याच वेळेस त्यांना अचानक खोकला आला.

त्यानंतर त्यांच्या सहमैत्रिणींनी त्यांना सांगितले की, तुम्ही पाणी पिऊन या यानंतर माधुरी या पाणी पिण्यासाठी गेल्या. मात्र त्या परत आल्याच नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माधुरी गायकवाड या वेगवेगळ्या संस्थांवर लेखिका म्हणून कार्यरत होत्या.

त्याचप्रमाणे अनेक संस्थांवर त्या ट्रस्टी म्हणून देखील होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण जेव्हा समोर आले तेव्हा अनेकांना धक्का बसला. पाणी पिल्याने त्यांना ठसका लागला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणी पिताना देखील व्यवस्थित प्यावे, असे देखील आता अनेक जण सांगताना दिसत आहेत.

Team Hou De Viral