रोज सकाळी नाश्त्यात एक प्लेट पोहे खाल्ल्याने आपल्याला मिळतात हे ‘5’ फायदे

रोज सकाळी नाश्त्यात एक प्लेट पोहे खाल्ल्याने आपल्याला मिळतात हे ‘5’ फायदे

निरोगी आणि दीर्घायुषी जीवन सगळ्यांनाच हवं असतं. अर्थात यासाठी हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी पदार्थाचे सेवन करत असाल पण वेळ मात्र चुकत असेल तर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सकाळचा नाष्ता करणं शरीरासाठी खूप आवश्यक असतं. जेव्हा कधीही भूक लागते आणि झटपट काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा हेल्दी फूड म्हणून अनेकजण पोहे बनवतात. सकाळच्या नाष्त्याला पोहे खाणं हा उत्तम पर्याय आहे. अनेक घरांमध्ये दर दोन दिवसांनी पोह्यांचा नाष्ता असतो. तर काही घरात बाहेरून आणलेले नाष्त्याचे पदार्थ खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला पोहे खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

उर्जा मिळते

नाष्त्याला पोहे खाल्याने दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही. पोहे खाल्यानं पोट भरतं. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात. दिवसाची चांगली सुरूवात होण्यासाठी तसंच उर्जा मिळण्यासाठी पोहे हा अतिशय उत्तम पर्याय आहे.

चवीसह पोषणही मिळते

पोहे बनवत असताना शेंगदाणे कधी बटाटे, अन्य ड्रायफ्रुट्स आणि कांद्यांचा वापर केला जातो. पोह्यांच्या सेवनानं शरीराला पोषण मिळतं. तसंच खाताना वेगवेगळ्या चवींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. चवीनं खाण्याबरोबरच पोषणही मिळत असल्यामुळे पोह्याचा समावेश नाष्त्यासाठी करायला हवा.

वजन कमी करण्यासाठी

पोह्यात खूप कमी कॅलरिज असतात. जर तुम्हाल वजन कमी करायचं असेल तर ब्रेड बटर किंवा टोस्ट वैगेरे खाणं सोडून द्या आणि पोह्याचा नाष्ता करा. यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल तसंच वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढता येते.

पोट साफ होण्यास मदत होते

पोह्याच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही नाष्त्यासाठी कोणतेही बाहेरचे पदार्थ खात असाल तर ते पचण्यास वेळ लागतो. पण नाष्त्याला पोहे खाल्यास पचायला फारसा वेळ लागत नाही. पोहे एक फाइबर युक्त एक लाइट फूड आहे. पचनासाठी चांगले असून शरीराला दीर्घकाळ उर्जा मिळण्यास मदत होते.

शरीरातील ऑक्सिजनचा स्तर व्यवस्थित राहतो

पोहे खाल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. जेव्हा शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. शरीरातील ऑक्सिनजनची लेव्हल वाढते आणि नेहमी निरोगी राहता येतं. डायबिटिस असलेल्या रुग्णांसाठीही पोहे फायदेशीर ठरू शकतात. कमी तेलात पोहे तयार करून सकाळच्या नाष्त्याला दिल्यास डायबिटिस असलेल्या रुग्णांसाठीही हा उत्तम ठरू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral