पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीने दिली ‘ही’ आनंदाची बातमी ? लवकरच…

पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीने दिली ‘ही’ आनंदाची बातमी ? लवकरच…

मराठी चित्रपटसृष्टीत पूजा सावंत ही आघाडीची अभिनेत्री समजली जाते. त्याचबरोबर वैभव तत्ववादी हा देखील एक आघाडीचा कलाकार म्हणून समजला जातो. वैभव तत्ववादी याने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

वैभव तत्ववादी याने बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये चिमाजी आप्पा ही भूमिका अजरामर केली होती. त्याचप्रमाणे त्याने मराठी मालिकामध्येही काम केले. पूजा सावंत आणि वैभव तत्त्वावादी यांची जोडी देखील खूपच मस्त अशी आहे. आता ही जोडी लवकरच आपल्याला एका अल्बम मध्ये दिसणार आहे.

पूजा सावंत हिचा जन्म 25 जानेवारी 1990 मध्ये झालेला आहे. ती सध्या 31 वर्षाची आहे. तिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे. पूजा सावंत हिने दगडी चाळ लपाछपी, भेटली तू पुन्हा, निळकंठ मास्तर या सारख्या चित्रपटात काम केले आहे. दगडी चाळ मधील तिची भूमिका ही सर्वांनाच आवडली होती. ती आता हिंदी चित्रपटात देखील काम करत आहे.

तिचा हिंदीतील एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. आता देखील पूजा सावंत चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे पूजा सावंत हिने नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये आपल्याला बॉलीवूडचा कुठला अभिनेता आवडतो. याबद्दल माहिती दिली. सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमामध्ये पूजा सावंत ही सहभागी झाली होती.

यावेळेस सुबोध भावे याने तिला सिद्धार्थ मल्होत्रा याचा फोटो दाखवला होता. सिद्धार्थ मल्होत्रा हा तिचा आवडता अभिनेता आहे. त्याचा फोटो पाहिल्यानंतर पूजा सावंत ही खूपच लाजली. लाजल्यानंतर हा माझा क्रश आहे. त्याच्यासोबत लग्न करायला मला आवडेल, असे म्हटले आहे.

मात्र, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचे सध्या प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात येते. पूजा सावंत देखील प्राण्यांविषयी अतिशय जागरूक असते. अनेकांना याबाबत कळकळीची विनंती देखील करत असते. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांचा लवकरच एक अल्बम येणार आहे. या अल्बम चे नाव चल अब वहाॅं असे आहे.

या अल्बमच्या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच जम्मू कश्मीर येथे करण्यात आले. या वेळी पूजा सावंत हिने सांगितले की, जम्मू कश्मीर येथे चित्रीकरण करण्याचा अनुभव काहीसा वेगळा होता. वैभव सोबत काम करण्याची मजा काही वेगळीच असते. त्याच्यासोबत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली, हे खूप बरे झाले असे पूजा सावंतने म्हटले आहे.

तर लवकरच आपल्याला ही जोडी या अल्बम मधून रोमँटिक अंदाज मध्ये गाणे सादर करताना दिसणार आहे.

Team Hou De Viral