खुपचं वाईट ! नुकतीच आई झालेल्या या अभिनेत्री वर कोसळला दुःखाचा डोंगर

खुपचं वाईट ! नुकतीच आई झालेल्या या अभिनेत्री वर कोसळला दुःखाचा डोंगर

मालिका विश्वामध्ये सध्या मोठे उलट फेर पाहायला मिळत आहेत. अनेक मालिका या चांगल्या पद्धतीने सध्या सुरू आहेत. मात्र काही मालिकांना टीआरपी मिळत नाही. अशा मध्येच या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील अनेक घटना घडामोडी घडताना दिसत आहेत.

सध्या हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री या दुःखात असल्याचे दिसत आहेत. काही दिवसापूर्वीच एका मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर आपल्या चहात्यांना माहिती देखील दिली आहे. या अभिनेत्रीचं नाव पूजा बॅनर्जी असे आहे. पूजा बॅनर्जी ही सध्या आपल्याला कुमकुम भाग्य या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे.

या आधी देखील तिने अनेक मालिका चित्रपटात नाटकात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. कुमकुम भाग्य या मालिकेमध्ये तिची भूमिका सगळ्यांनाच खूप आवडते. विशेष करून या मालिकेमध्ये आपल्याला मराठी कलाकार देखील भरभरून पाहायला मिळत आहेत. अनेक मराठी घरामध्ये ही मालिका फार आवडीने पाहिली जाते. गेल्या अनेक वर्षापासून हिंदी मालिकांना मराठी घरात खूपच चांगल्या प्रकारे पसंती मिळत असते.

हिंदी मालिकेमध्ये कुमकुम भाग्य ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही काही दिवसापूर्वीच आई झाली आहे. मात्र आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची बातमी देखील समोर आली आहे. पूजा ही नुकतीच आई झाली आहे. मात्र आई झालेली असतानाच आणि तिचे करियर व्यवस्थित सुरू असतानाच तिच्या बाबतीतली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पूजा हिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. पूजा हिने याबाबत सोशल मीडियावर आपल्या वडिलांचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. वडील गमावल्यानंतर पूजा ही खूपच भावनिक झाल्याचे मिळत आहे. तिने या पोस्टवर म्हटले आहे की, बाबा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. मला माहित आहे तुम्ही जिथे आहात तिथे चांगल्या ठिकाणी आहात.

तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही. मला तुमची नेहमीच आठवण येईल. पूजा ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर तिच्या वडिलांप्रती आदरांजली अर्पण केली आहे.

Team Hou De Viral