‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ मालिकेतील पल्लवीने दिली ‘गुडन्यूज’

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अनेक भूमिका या दिसलेल्या आहेत. मात्र, यातील काही भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.
या मालिकेमध्ये आपल्याला पूजा बिरारी ही देखील दिसली आहे. पूजा बिरारी हिने या मालिकेमध्ये पल्लवीची भूमिका अतिशय अचूकपणे पार पाडली आहे, तर या मालिकेमध्ये आपल्याला शांतनुची भूमिका देखील दिसलेली आहे. त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना माहिती देत असतात. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळे फोटो देखील शेअर करत असतात. सध्या कलाकारांसाठी सोशल मीडिया हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सोशल मीडियाच्या वापर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा वापर वाढण्याचे कारण म्हणजे या माध्यमातून आपल्या आवडत्या प्रेक्षकांपर्यंत कलाकारांना जाता येते.
त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे देखील कमवता येतात. फेसबुक, इंस्टाग्राम आणि आता ट्विटर देखील ब्लू टिक असणाऱ्यांना पैसे मोजणार आहे, तर instagram वर देखील हजारो लाखो रुपये कमवता येतात. मात्र तुम्हाला हवा तसा कंटेंट प्रेक्षकापर्यंत द्यावा लागतो. काही दिवसापूर्वी प्रिया मराठे हिलादेखील इंस्टाग्राम वर व्हेरिफाय करण्यात आले होते.
त्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. आता पूजा बिरारीच्या बाबतीत देखील एक बातमी समोर आली आहे. पूजा बिरारी हिने देखील आपल्या चहात्यांचे आभार मानले आहेत. इंस्टाग्राम वर तिचे दीड लाख फॉलोवर जवळपास झाले आहेत. मला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल चाहत्यांची मी आभार मानते, असे पूजा बिरारी हिने नुकत्याच एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर आपल्याला पूजा बिरारी आवडते का? या मालिकेतील इतर कुठल्या भूमिका आवडतात आम्हाला नक्की सांगा.