अल्लू अर्जुन सोबत दिसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला चाहत्याने केली ‘तसल्या’ फोटोची मागणी, अभिनेत्रीने जबराट उत्तर देत केली बोलती बंद

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण कधीकधी या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. नुकताच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत देखील असेच काहीसे झाले आहे.
नुकताच अभिनेत्री पूजा हेगडे इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांशी संवाद साधत होती. तिने ‘Post a photo of’ या ट्रेंडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी पूजाचे कधी न पाहिलेले फोटो पाहायला मिळाले. दरम्यान एका यूजरने तिच्याकडे न्यू *ड फोटोची मागणी केली होती.
पूजाने या नेटकऱ्याला उत्तर देत पायाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘नं गे पाव’ असे कॅप्शन दिले आहे. पूजाने दिलेले उत्तर पाहून त्या नेटकऱ्याची बोलती बंद झाली असेल. पूजा हेगडे ही अतिशय लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
तिने ‘मोह जोंदा रो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशुतोष गोवारिकर यांच्या या चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसली होती. आता ती लवकरच सुपरस्टार प्रभास सोबत ‘राधेश्याम’ या चित्रपटात दिसणार आहे. पूजा आणि प्रभासला चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.