प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत ‘या’ विवाहित मराठी अभिनेत्याच्या प्रेमात?

अल्पावधीत कलाविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ही अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
विशेष म्हणजे दरवेळी ग्लॅमरस फोटोशूट किंवा अभिनयामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री यावेळी एका अन्य कारणामुळे चर्चेत आली आहे. पूजा सावंत मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंदी आणि मराठी कलाविश्वात आपलं स्वतंत्र स्थान मिळवणाऱ्या अभिनेता गश्मीर महाजनीला पूजा सावंत डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीक सुरु असतानाचा या दोघांमधील खास मेसेज समोर आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
समोर आलेल्या मेसेजनुसार, उद्या (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे असल्यामुळे गश्मीर पूजासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, गश्मीर आणि पूजामधील हे चॅट पाहिल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु, खरंच या दोघांमध्ये काही खास नातं आहे की, केवळ आगामी चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी हे दोघं असं करतायेत हे मात्र गुलदस्त्यात आहे.