250 हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या ‘या’ कॉमेडी कलाकाराचे फुफ्फुसाच्या आजाराने निधन

250 हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या ‘या’ कॉमेडी कलाकाराचे फुफ्फुसाच्या आजाराने निधन

मनोरंजन विश्वामध्ये 200 किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट करणारे अभिनेते हे फार कमी आहेत. यामध्ये काही कलाकारांचा समावेश आपल्याला करता येईल. एका मागून एक चित्रपट करणे ही अवघड बाब आहे आणि त्यासाठी खूप वेळ परिश्रम आणि अभिनयात जीव ओतावा लागतो. असे काम करणारे कलाकार हे सर्वोत्कृष्ट ठरत असतात.

मात्र गेल्या काही दिवसांमध्ये असे काम करणारे कलाकार आपल्याला सोडून जात असल्याचे बातम्या देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आता देखील 250 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अवघी दक्षिणात्य चित्रपटसृष्टी हळहळली आहे. त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दक्षिण चित्रपटसृष्टीला अजून एक धक्का बसलेला आहे. कारण की एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. या अभिनेत्याने तब्बल अडीचशे हून अधिक जास्त चित्रपटात काम केले होते. त्यांनी काम केलेले चित्रपट हे अतिशय लोकप्रिय असे झाले होते. ते तिकडे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते होते. दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये कोचू प्रेमन हे अतिशय लोकप्रिय अभिनेते होते.

वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्रेमन हे चाहत्यांमध्ये फारच लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे जाणे हे मनाला वेदना देणारे आहे, असे अनेकांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून प्रेमन हे आजारी होते. त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होता. आजार दिवस जसे लोटले तसा वाढतच गेला आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रेमन यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना खूप धक्का बसला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये ते अतिशय आघाडीचे असे अभिनेते होते.

त्यांनी अनेक मालिका थिएटर यामध्ये काम करून सगळ्यांचेच मन जिंकले होते. 250 हुन अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून आपले अभिनयाचा डंका वाजवला होता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही खूपच जास्त होती.

Team Hou De Viral