सकाळी सकाळी पोट साफ होत नाही..पोटातली घाण बाहेर काढायची तर हे करा उपाय.. पोट साफ झालच म्हणून समजा…

अनेकांना आपण पाहिले असेल की सकाळी उठल्याउठल्या त्यांना पोट साफ न होणे ही समस्या असते. असे लोक मला सिगारेट दिल्याशिवाय किंवा तंबाखू खाल्ल्याशिवाय किंवा चहा पिला शिवाय प्रातविधी येतच नाही, असे म्हणतात. मात्र, हा त्यांचा गोड गैरसमज असतो. शरीराला त्यांनी तशी सवय लावून घेतलेली असते. त्यामुळे त्यांना असे केल्याने प्राप्त विधी होतो, असे वाटत असते.
मात्र, असे काही नसते. केवळ त्यांची ही मानसिकता असते. जरी आपल्याला सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर आपण काही घरगुती उपाय करून यावर मात करू शकता. आपण व्यायाम सारखा पर्याय देखील निवडू शकता. दैनंदिन व्यायाम केल्याने आपली पचनक्रिया ही चांगली राहते. त्यामुळे व्यायाम नियमितपणे करावा. आपल्याला असे पाच उपाय सांगणार आहोत, हे उपाय करून आपण आपले पोट नियमितपणे साफ करू शकतात.
1) गरम पाणी – सकाळी उठल्यावर अजिबात पोट साफ होत नाही अशा लोकांनी रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी करायचे आणि ती प्यायचे. तुमचे पोट काही वेळानंतर साफ झालेच म्हणून समजा. तसेच गरम पाणी भरून ठेवून घोट घोट प्यायचे. त्यानंतर आपल्या पोटातील घाण सगळी बाहेर निघण्यास नक्कीच मदत होते. हा उपाय आपण काही दिवस करावा. यामुळे आपल्या ऍसिडिटी, पित्त सारखा त्रास देखील होत नाही.
2) अद्रक – अद्रक हे खूप गुणकारी असे समजले जाते. अद्रक् चा उपयोग आपण भाजी करताना किंवा वरण करताना करतो. तसेच विविध पदार्थांमध्ये अद्रकं उपयोग होत असतो. त्यामध्ये एलिमेंटरी तत्व असतात. यामुळे तुमच्या शरीरातील घाण यामुळे बाहेर पडत असते. जर गरम पाणी पिऊनही आपले पोट साफ होत नसेल तर आपण अद्रकाचा एक तुकडा मीठा सोबत खावा, असे केल्याने आपले पोट साफ होण्यास नक्कीच मदत होते.
3) संध्याकाळी उपवास करावा – जर आपल्याला संध्याकाळी सहज उपवास करणे शक्य असेल तर आपण संध्याकाळी काहीही खाऊ नये, असे आठवड्यातून काही दिवस करावे. त्यामुळे देखील आपले पोट स्वस्थ राहण्यास मदत होते. तसेच आपल्याला शक्य नसेल तर थोडा हलका आहार घ्यावा. यामुळे आपली पचनक्रिया ही सुरळीत राहते. तसेच फळांचे सेवन देखील करावे.
4) उच्च फायबर युक्त पदार्थ – उच्च फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटातील अतिरिक्त घाण बाहेर पडण्यास मदत मिळत असते. त्यामुळे उच्च फायबर युक्त पदार्थ आपण नियमितपणे खावे, असे केल्याने आपली पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच केळीचे प्रमाण नियमित ठेवाव की यामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च फायबर असते. यामुळे आपल्याला पोट साफ होण्यास मदत मिळते.
5) सफरचंदाचा व्हिनेगर – सर्व उपाय करूनही आपल्याला काही फरक पडत नसेल तर आपण शेवटी सफरचंदाचा विनेगर घ्यावा. हा विनेगर घेतल्याने आपल्या पोटात कळ येऊन आपलं पोट नक्कीच साफ होण्यास मदत मिळते. संशोधनात हे अजून सिद्ध झाले नाही. मात्र, अनेक जण असे सांगतात की, विनेगर घेतल्याने आपले पोट साफ होण्यास नक्कीच मदत मिळते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.