पोट खूप दुखत आहे का.. मग हे करा घरगुती उपाय.. आराम पडलाच म्हणून समजा..

आजकालच्या तरूण आणि मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटदुखीची समस्याही निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच वृद्ध माणसांना देखील पोटदुखीचा त्रास हा मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. याचे करणे देखील वेगवेगळे आहेत. अनियमित खाणे, बाहेरचे खाणे, हॉटेलिंग करणे तसेच अवेळी खाणे. यामुळे पोट दुखी समस्याही मोठ्या प्रमाणात होत असते.
रात्री उशिरा जेवण करणे आणि जड अन्न खाणे यामुळे देखील पोट दुखीची समस्या निर्माण होते. रात्री चिकन किंवा मटण असे जड पदार्थ खाल्यास पचायला जड जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हलक जेवण करावे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. जर आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल तर आपण खालील उपाय करून त्यावर मात करू शकता. तर मग जाणून घेऊया कुठले उपाय आहेत ते..
१. ओवा व मीठ : वातामुळे पोट दुखी असल्याने पोटावर ताण वाढतो. यामुळे पोट दुखते. ओवा आणि मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण एक चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्याने वायू आपला पोटातला निघून जातो आणि आपली पोटदुखी थांबते. हा प्रयोग आपण काही दिवस करावा. यामुळे आपली पोट दुखी ही थांबते.
२. अमृत धारा: अमृतधारा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. जर आपल्याला पोटदुखीची समस्या असल्यास अमृतधारा चे तीन ते चार थेंब, बत्ताशामध्ये टाकून ते खावे. यामुळे पोट दुखणे कमी होते. छातीत आपल्याला आराम पडतो.
३. मोहरी: घरात आपल्या मोहरी उपलब्ध असते. वरण, भात, भाजी, फोडणी देण्यासाठी मोहरी उपयुक्त असते.मोहरीचा उपयोग पोट दुखीवर देखील होतो. त्यामुळे आपले पोट दुखत असेल तर दहा ग्रॅम मोहरी एक कप पाण्याबरोबर घेटल्यास पोटदुखी थांबते.
४. मोहरी पूड, दही: दह्याचा उपयोग आपण नेहमी करत असतो. जर आपल्याला पोटदुखी त्रास होत असेल तर त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावा. त्यामुळे पोटातील किडे मरून जातात.
५. टोमॅटो, काळी मिरी: आपल्या घरामध्ये टोमॅटो आणि काळी मिरी सहज उपलब्ध असते जर आपले पोट दुखत असल्यास आपण टोमॅटो सोबत काळीमिरी टाकून घेतल्यास आपल्या पोटातील किडे मरतात आणि आपली पोटदुखी थांबते.