या कलाकाराचे झाले निधन, सिनेसृष्टीवर शोककळा !

या कलाकाराचे झाले निधन, सिनेसृष्टीवर शोककळा !

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यांमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारी आता आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या महामारीचा उद्रेक थांबवण्यात काही प्रमाणात यश आले आहे.

मात्र, अजूनही अनेक लोक लसीकरण याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आता सरकार देखील यावर कठोर होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. गेल्या वर्षी कोरोना महामारीने अनेक जणांना आपल्यातून हिरावून घेतले. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक कलाकारांचा समावेश होता.

या कालावधीमध्ये “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील नटुकाका अर्थात घनश्याम नायक यांचे दुःखद निधन झाले. मात्र, त्यांचे कोरोनाने निधन झाले. तर नदीम-श्रवण जोडीतील श्रावण राठोड यांचे देखील कोरोना निधन झाले. आता देखील मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अवीट संगीताने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ संगीतकाराने नुकतीच आपल्या मधून एक्झिट घेतली आहे.

त्यांना गाणारे व्हायोलीन असे देखील म्हटले जायचे. या टॅगलाईन खाली त्यांनी अनेक गाण्यांना संगीतबद्ध केलेले आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी गानारे व्हायोलीन याच्या माध्यमातून या वादनाला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी याच वाद्याच्या साह्याने गीत-रामायण देखील समृद्ध केले होते.

अशा या संगीतकाराचे नाव प्रभाकर जोग असे होते. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता अबोल झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, व्हायोलिन लागायला लावणारा शब्दापलीकडे जाऊन त्यातून अर्थ आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे.

ग दि माडगूळकरांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलीनच्या माध्यमातून जिवंत केले. गीत रामायणाच्या पाचशेपेक्षा अधिक कार्यक्रमांना त्यांनी सुर दिले. “गाता रहे मेरा व्हायलिन” या त्यांच्या गीतांच्या कॅसेट आणि व्हीसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या.

स्वर आले दुरुनी, तेच स्वप्न लोचनात, बाजार फुलला भरला, हे चांदणे फुलांनी, सोनियाचा पाळणा, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का, यासारखे त्यांचे गाणे अतिशय लोकप्रिय असे ठरले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Team Hou De Viral