अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा मोठा बोलबाला सध्याच्या काळामध्ये पाहायला मिळतो. प्राजक्ता गायकवाड ही आपल्याला अनेक मालिकांमधून दिसली आहे. मात्र, असे असले तरी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून तिने महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले आहे.

प्राजक्ता गायकवाडकडे आगामी काही चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आपले अनेक विचार शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता गायकवाड जवळच्या एका व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे तिने याबाबत एक पोस्ट शेयर केली आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिचे आजोबा आहेत. आजोबांचे आणि तिचे नाते अतिशय भावनिक होते.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचली. पण त्यानंतर ती चर्चेत आली ती अलका कुबल यांच्यासोबत झालेल्या वादामुळे. आई माझी काळुबाई मालिकेदरम्यान झालेला तो वाद चिघळला. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आजोबा आता कोण माझे लाड करणार, कोण माझ्यासोबत हरिपाठ म्हणणार, अतिशय शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव. सगळ्या गावात एकच चर्चा आणि तालुक्यात धाक असायचा. येणाऱ्या प्रत्येकाची चेष्ठा मस्करी करून बोलायचाचं.

येसुबाईंची भूमिका करणारी आमची नात म्हणून पूर्ण गावात तालुक्यात चर्चा कराचायात. माझा अभिमान बाळगणारे. शेवटपर्यंत स्वाभिमानाने व ताठ मानेनं सगळे आयुष्य जगलात. वारकरी संप्रदायात रमणारे. मला लहानपणापासून हरिपाठ, ज्ञानेश्वरी गाथा, संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा.

कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत. तुमची आठवण कायम राहिल. देवाच्या मनात काय आहे याचा अंदाज लावू शकत नाही. रात्री सिरीयल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ, असं म्हणून सोडून गेलात आजोबा. आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली… अशी पेस्ट तिने शेअर केली.

तिच्या‌ या पोस्ट वर चाहत्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. एका चाहत्याने म्हटले की, आज मला माझ्या आजोबांची आठवण आली. माझे आणि आजोबांचे नातं पण असंच होतं. आणखी एकाने आपल्या मनातली खंत बोलून दाखवत म्हटले की, असे आजोबा फक्त नशिबवाल्यानाच मिळतात .भावपूर्ण श्रद्धांजली. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील येसूबाई यांच्या भूमिकेसाठी प्राजक्ता ओळखली जाते.

ती लवकरच लक डाऊन लग्न या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Team Hou De Viral