‘माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आणि १० पावलं पुढे आहे, ‘रान बाजार’ च्या टिझर वरून प्राजक्ताचा खुलासा

‘माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आणि १० पावलं पुढे आहे, ‘रान बाजार’ च्या टिझर वरून प्राजक्ताचा खुलासा

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सध्या ती खूप जाड झाली आहे. यामुळे देखील तिला अनेक जण ट्रोल करताना दिसत असतात, तर तिच्या सौंदर्याचे अनेक जण कौतुक देखील करत असतात.

प्राजक्ता माळी ही आपल्याला हास्य जत्रा या शोमधून सूत्रसंचालन करतना दिसते. या शोमध्ये ती वा दादा व असे म्हणताना दिसते. यावर अनेक जण तिला ट्रोल देखील करताना दिसत असतात. प्राजक्ता माळी हिने काही दिवसापूर्वी लग्नसंस्थेवर अशी टीका केली होती.

माझं पहिलं लग्न अशा संस्थांमधून असं करण्यात आलं होतं. त्यामुळे मला या संस्थांवर अजिबात विश्वास नाही. मात्र मी त्यामध्ये फसले, असे देखील तिने म्हटले होते. आता मी प्रेम करून लग्न करणार असे तिने म्हटले होते. आता प्राजक्ता माळी ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिची रान बाजार ही वेब सिरीज.

लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसून येत आहेत. मोहन आगाशे यांच्यासह इतर कलाकारांच्या भूमिका यात पाहायला मिळणार आहेत. मात्र, यामध्ये तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन मुळे त्या दोघीही चर्चेत आल्या आहेत.

विशेष म्हणजे प्राजक्ता माळी ही जरा जास्तच चर्चेत आली आहे. कारण की प्राजक्ता आजवर सोज्वळ भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून गणल्या गेली आहे, तर आता या रान बाजार या वेब सिरीज मध्ये तिने अतिशय बोल्ड सीन दिला आहे. त्यामुळे तिच्यावर खूप टीका होत आहे.

याबाबत तिने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, हा सीन करताना मला महाराष्ट्रातून टीकेची अपेक्षा नव्हती. मात्र, अनेक जण माझ्यावर टीका करत आहेत. यातच माझे यश आले, असे तिने म्हटले आहे. रान बाजार या वेब सिरीजचे दिग्दर्शन अभिजीत पानसे हे करत आहेत.

ही वेबसिरिज नेमकी कशावर आहे, याचा उलगडा अजून झाला नाही. मात्र याबाबत लवकरच माहिती कळणार आहे. प्राजक्ता माळी हिने आपल्या आईला या सीन बद्दल काय वाटतं याबद्दल ही माहिती दिली आहे. प्राजक्ता म्हणाली की, माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. ती माझ्यापेक्षा १० पावलं पुढे आहे.

तिची मी परवानगी घेऊन ही वेबसीरीज केली. ती माझी एक कलाकार आणि एक माणूस म्हणून विभागणी करु शकते. कलाकार म्हणून तिचा मला यासाठी पाठिंबा दिला, असे प्राजक्ता हिने सांगितले यावर देखील अनेकांनी कमेंट करून प्राजक्ता यांच्यावर टीका केली आहे तर काही जणांनी तिचे कौतुक केले आहे तर आपल्याला प्राजक्ता माळी आवडते का नक्की सांगा

Team Hou De Viral