लग्नाबाबत ‘प्राजक्ता माळी’ ने धक्कादायक खुलासा, म्हणाली…

लग्नाबाबत ‘प्राजक्ता माळी’ ने धक्कादायक खुलासा, म्हणाली…

लग्न पहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीप्रमाणे लग्न या गोष्टीवर अनेकांचे वेगवेगळे मत पाहायला मिळतात. विवाह संस्था, लग्न यामुळे भारतीय संस्कृती अजूनही टिकून आहे.

माञ गेल्या काही दिवसांमध्ये नातेसंबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाल्याने अनेक विवाह संस्था लग्न जुळवणीच्या क्षेञात काम करत आहेत. मात्र याच विवाहसंस्थेवर आता मराठीतील दिग्गज अभिनेत्री प्राजक्ता माळी ही भडकली आहे. आणि आपले सडेतोड उत्तर तिने या मुद्द्यावर दिलेले आहेत. लग्नाविषयी ती काय म्हणाली आम्ही आपल्याला या लेखामध्ये सांगणार आहोत.

प्राजक्ता माळी हिचा हिचा नुकताच ‘लग्न डाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अंकुश चौधरी हा दिसला आहे. या चित्रपटाची चर्चा देखील आता सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मराठी प्रेक्षक या चित्रपटाला पसंत करत आहेत. प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

तिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. प्राजक्ता माळी हिने काही वर्षांपूर्वी ‘जुळून येती रेशिम गाठी’ ही मालिका केली होती. ‘जुळून येती रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये तिच्यासोबत ललित प्रभाकर हा दिसला होता. या सोबतच तिने सुहासनी ही मालिका देखील केली होती. सध्या प्राजक्ता माळी ही टेलिव्हिजनवर आपल्याला दिसते.

प्राजक्ता माळी हिने विवाह या गोष्टीवर आपले सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच प्रमाणे मॅट्रिमोनियल साईट याबद्दल ही तिने आपले मत व्यक्त केले आहेत. तिचा मॅट्रिमोनी साइटवर राग असल्याचे दिसून आले आहे. यावेळी प्राजक्ता माळी म्हणाली की, मॅट्रिमोनियल साईट या माध्यमातून लग्न करणे हे अतिशय चुकीचे असते.

माझ्या आईने नुकताच एक प्रताप केला होता. या साइटवर अतिशय लुबाडणूक होते, असे तिने म्हटले आहे. माझ्या मते जर लग्न करायचे असले तर ते प्रेमात पडूच करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्याच्या सोबत लग्न करायचे आहे, त्याला आपल्या चांगल्या पद्धतीने ओळखता येते. आपण अनोळखी माणसासोबत लग्न कसे करू शकतो, असे तिने म्हटले आहे.

त्यामुळे मी जेव्हा केव्हा लग्न करेल, तेव्हा प्रेमात पडून लग्न करेल, असे मी आईला देखील सांगितले आहे, असेही प्राजक्ता हिने सांगितले. त्यामुळे आता माझी आई देखील मॅट्रिमोनी या साईट वर जाणार नाही. याचा मला विश्वास आहे. त्यामुळे ज्याला जसे वाटेल तसे त्याने करावे. त्यावर माझे कुठलेही बंधन नाही.

मला जे वाटते ते मी व मत व्यक्त केले आहे, असेही प्राजक्ता हिने या वेळी सांगितले आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या मताशी आपण सहमत आहात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral