या अभिनेत्रीने ‘जीव माझा गुंतला’ मालिका सोडली, तिच्याजागी होणार ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

या अभिनेत्रीने ‘जीव माझा गुंतला’ मालिका सोडली, तिच्याजागी होणार ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

“जीव माझा गुंतला” या मालिकेमधील एका अभिनेत्रीने नुकतीच ही मालिका सोडली आहे. आता या अभिनेत्रीच्या जागी दुसर्‍या एका अभिनेत्रीची नव्याने मालिकेतील एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी आपण ऐकली असेल.

“जीव माझा गुंतला” या मालिकेमध्ये सुवासिनी मामी हे पात्र देखील प्रचंड गाजत आहे. सुवासनी मामी यांची भूमिका अभिनेत्री सुमेधा दातार यांनी साकारलेली आहे. सुमेधा दातार यांनी याआधी देखील अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. सोशल मीडियावर सुमेधा दातार यांनी नुकतीच माहिती दिली आहे. माझ्या पायाला अपघात झाला आहे.सुरुवातीला असे वाटले की पाय मुरगळला असेल.

मात्र, ज्या वेळेस मी डॉक्टरांकडे जाऊन एक्स-रे काढला, त्या वेळेस माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यानंतर पायाला आता प्लास्टर लावले आहे. दीड महिना आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता घरी आराम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळामध्ये आग मालिका सोडण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तसेच एखाद्या पात्राची भूमिका ही संपली की त्याला पुन्हा काम देखील मिळत नाही. अशा अनेक मालिका सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, अभिनेत्री मीरा जोशी हिने देखील बायको अशी हवी ही मालिका सोडली आहे. यानंतर खरे कारण समोर आले होते. बायको हवी अशी या मालिकेमध्ये मीरा जोशी हिने नकारात्मक भूमिका साकारली होती.

मात्र, आता मालिकेतील तिची भूमिका संपली आहे. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पर्यायाने तिला मालिका सोडण्यास भाग पाडले. याप्रमाणे ती आता बिग बॉस मराठी 3 यामध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येते. “जीव माझा गुंतला” या मालिकेमध्ये श्वेता ही भूमिका देखील चांगलीच गाजली होती. मात्र, श्वेता देखील आता ही मालिका सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारण ती बिग बॉस मराठी 3 मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेता ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता नवणाले हिने साकारली होती. आता श्वेता म्हणजेच प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री पूर्वा शिंदे असणार असल्याचे सांगण्यात येते. पूर्वा शिंदे हिने या आधी “लागिर झालं जी” या मालिकेमध्ये जयडी ही भूमिका केली होती. तिची भूमिका खूप गाजली होती. या प्रमाणे तिने “चला हवा येऊ द्या” मध्ये देखील काम केलेले आहे.

चला हवा येऊ द्या मध्ये तिची भूमिका सगळ्यांनाच खूप आवडते. याप्रमाणे लेडीज जिंदाबाद, तुझं माझं जमलं, घेतला वसा टाकू नको, यासारख्या मालिकामध्ये तिने काम केलेले आहे. त्यामुळे आता “जीव माझा गुंतला” या मालिकेतील तिची भूमिका देखील प्रेक्षकांना निश्चितच आवडणार हे नक्की.

Team Hou De Viral