‘तुम्ही दिसता छान पण तेवढंच घाण…’, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या तोंडावर बोलून गेला असं काही…

‘तुम्ही दिसता छान पण तेवढंच घाण…’, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या तोंडावर बोलून गेला असं काही…

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून चर्चेत आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेमध्ये तिने नेहाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे. प्रार्थना बेहेरे हिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तसेच तिने मराठी मालिका व चित्रपट देखील खूप काम केले आहे.

तिने पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले आहे. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटाला राज्यामध्ये प्रचंड यश मिळाले होते. प्रार्थना बेहेरे हिला काही पुरस्कार देखील या चित्रपटासाठी मिळाले होते. प्रार्थना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

तसेच आपले फोटो देखील ती या माध्यमातून शेअर करत असते. आपले विचार देखील ती मांडत असते. काही दिवसांपूर्वीच तिने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो अनेकांना ओळखता आला नाही. प्रार्थना बेहेरे हिने अभिषेक जावकर याच्या सोबत लग्न केले आहे. अभिषेक हा देखील चित्रपट सृष्टीशी संबंधितच आहे.

तो दक्षिणेमध्ये चित्रपटाचा डिस्ट्रीब्यूटर आहे. अभिषेक याने डब्बा या चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांची जोडी अतिशय परफेक्ट असून त्यांची केमिस्ट्री देखील खूप जुळत असल्याचे सांगण्यात येते. प्रार्थना बेहेरे हिने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केल्याने काही जणांनी तिच्यावर खिल्ली उडवणाऱ्या कमेंट देखील केल्या आहेत.

त्यामुळे प्रार्थना ही चांगलेच भडकली. त्यानंतर तिने काही जणांना सुनावून देखील दिले आणि यानंतर आपल्या प्रोफाईल वर कमेंट करायची नाही, असेही ती म्हटले होते. आता प्रार्थना ही नुकतीच बस बाई बस या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. बस बाई बस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे करतात.

या शोमध्ये आतापर्यंत अमृता फडणवीस, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी देखील सहभागी झाले होते. आता प्रार्थना या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सुबोध भावे यांनी तिला अनेक प्रश्न देखील विचारले. यावेळेस प्रार्थना हिने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, एकदा मालिकेचे चित्रीकरण सुरू होते.

त्यावेळेस माझा एक असिस्टंट जवळ आला आणि मला थेट असे म्हणाला की, मॅडम तुम्ही खूप छान दिसता त्यावर मी त्याला धन्यवाद म्हणाले. मात्र, त्यानंतर त्याने पुढे जे सांगितले ते मला हादरवून टाकणारे होते. पुढे तो म्हणाला की, तुम्ही तेवढ्याच घाण देखील दिसतात. त्यानंतर मला काय बोलावे हेच कळत नव्हते.

मात्र, त्याने असे का म्हटले असावे, हे काही मला कळू शकले नाही, असेही प्रार्थना हिने सांगितले. त्यानंतर सर्वजण हसू लागले.

Team Hou De Viral