‘बिगबॉस’च्या घरामध्ये प्रसाद जवादे आणि अमृता धोंडगे यांच्यामध्ये प्रचंड वाद, शिवीगाळ

‘बिगबॉस’च्या घरामध्ये प्रसाद जवादे आणि अमृता धोंडगे यांच्यामध्ये प्रचंड वाद, शिवीगाळ

कलर्स मराठी वर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस शो आता रंजक वळणावर आला आहे. हा शो सुरु होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे आणि आता या शोमध्ये कॅप्टनसी टास्कसाठी हाणामाऱ्या होत असल्याचे देखील दिसत आहे. हा शो कोण जिंकणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे. बिग बॉसचा विजेता कोण होणार यामध्ये अनेक मत मतांतर आहेत.

मात्र बिग बॉसच्या घरामध्ये अनेक हाणामाऱ्या होत असल्याचे देखील गेल्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळाले. प्रसाद जवादे, अमृता धोंडगे यांच्यातला वाद आता खूपच पेटला असल्याचे देखील दिसत आहे. या आधी देखील अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये प्रचंड भांडण झाल्याचे आपण पाहिले आहे, तर बिग बॉसच्या घरामध्ये आता फारच रंजक घटना घडामोडी घडत आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये अनेक हाणामाऱ्या झाल्याचे आपण आजवर पाहिलेलेच आहे. मात्र आता प्रसाद जवादे आणि अमृता धोंडगे यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या एंटरटेनमेंटची शाळा हा कॅप्टनसी टास्क सध्या मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. या दरम्यानच या दोघांमध्ये प्रचंड भांडण झाल्याची पाहायला मिळाले या टास्क दरम्यान प्रसाद जवादे याने अमृता धोंडगे हिला नापास करून टाकले.

त्यामुळे ती प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ती शिवीगाळ देखील करायला लागली होती. त्यानंतर ती प्रसाद याला म्हणायला लागते की, इथे समजते की कोणाची बुद्धी किती आहे. लोक थुंकतील तुझ्या तोंडावर, असे म्हणून ती संतापाच्या घरात काही पण बोलून जाताना दिसत आहे. आधी काहीतरी समजून घ्यायचं, वाचायचं आणि मग बोलायचं असं म्हणत अमृता ही प्रसादच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे.

यावर प्रसाद तिला म्हणतो की, माझ्या अंगावर येऊ नको तू. नाहीतर वाईट परिणाम होतील, असेही म्हणतो. त्यानंतर अमृता धोंडगे त्याला म्हणते की, तू बधिर आहेस. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वाद वाढणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळत आहेत, तर बिग बॉस मधील कुठला स्पर्धक आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो ?आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral