वाईट बातमी ! ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतल्या ‘त्या’ कलाकाराचे निधन

वाईट बातमी ! ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतल्या ‘त्या’ कलाकाराचे निधन

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजीमधील प्रत्येक पात्रांनी उत्तम भूमिका साकारल्या आणि रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. आता या मालिकेतील एका अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

अभिनेता प्रशांत लोखंडे याचे १४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले.

कोंडाजी बाबा यांना मुरुड जंजिरा किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी मदत अब्दुला दळवी यांनी मदत केली होती. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अब्दुल्ला दळवी हे पात्र साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याने १४ सप्टेंबर रोजी रात्री जगाचा निरोप घेतला आहे.

इतक्या कमी वयात निधन झाल्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. या उत्तम कलाकाराच्या अचानक जाण्याने मित्र परिवार व अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अब्दुला दळवी यांचा “बाद में कटकट नको” हा डायलॉग प्रशांत लोखंडेने प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवला. अब्दुला दळवींच्या पात्राला प्रशांतने उत्तम न्याय दिला होता.

याशिवाय प्रशांतने स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत बाजी घोरपडे ही भूमिकादेखील उत्तम साकारली होती. दोन्ही मालिकेच्या टीम कडून व जगदंब क्रिएशनच्या परिवाराकडून प्रशांत लोखंडेला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *