‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील या अभिनेञीवर ओढवला वाईट प्रसंग…

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील या अभिनेञीवर ओढवला वाईट प्रसंग…

‘जीव माझा गुंतला” ही मालिका प्रचंड सध्या गाजत आहे. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना-घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. मालिकेमध्ये मल्हार आणि अंतरा यांची जोडी दाखवण्यात आलेली आहे. मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुले याने साकारली आहे.

मालिकेमध्ये तो मल्हार खानविलकर हे पात्र अतिशय व्यवस्थितरीत्या साकारताना दिसत आहे. तर अंतरा ही भूमिका देखील छान झालेली आहे. ही भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण हिने साकारलेली आहे. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना-घडामोडी नेहमीच घडत असतात. अंतराच्या बाबतीत कारस्थान करणारे देखील या मालिकेत अनेक जण आहेत.

या मालिकेमध्ये प्रतीक्षा मुणगेकर ही देखील काम करत आहे. प्रतीक्षा हिने या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त रित्या भूमिका साकारली आहे. आजकाल अनेक मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील खूप सक्रिय असतात. सोशल मीडिया अकाउंट वर ते आपले वेगवेगळे फोटो देखील शेअर करत असतात.

या माध्यमातून त्यांना अर्थार्जन देखील होत असते. सोशल मीडियावर आपले ठरावीक फॉलॉवर झाल्यानंतर आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैसे कमवतात. त्यामुळे अनेक कलाकार हे इंस्टाग्राम, फेसबुक ट्विटर यासारख्या अकाऊंटवर आपले फोटो आणि इतर माहिती शेअर करत असतात.

मात्र, याचा फटका अनेक अभिनेता व अभिनेत्री यांना यापूर्वी देखील बसला आहे. आता देखील प्रतिक्षा मुणगेकरचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत तिने आपल्या चाहत्यांना माहिती देऊन दुसर्‍या अकाउंटची लिंक देखील दिली आहे.

जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर हिच्यावर बाका प्रसंग ओढवला असून याबाबत तिने खुलासा केला आहे. तिने एका व्हिडिओद्वारे स्वतः हा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तिने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर अकाउंट नवीन अकाउंट ओपन केले आहे.

नवीन ओपन केलेल अकाउंट यूजर आयडी तिने या व्हिडीओ कॅप्शन मध्ये दिले आहे. अकाउंट हॅक झाल्यामुळे प्रतीक्षा म्हणते की, माझी इंस्टाग्राम वरची फॅमिली पूर्णतः विखुरल्या गेली आहे. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीला मिस करत आहे. ज्याप्रमाणे आधी माझ्यावर प्रेम करत होतात, तसेच आताही करा असे प्रतीक्षा या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.

यानंतर ती म्हणते की, माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा. मी खाली दिलेल्या यूजर आयडी आयडीला फॉलो करा, असे ती सांगते आहे.

Team Hou De Viral