अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

काही महिन्यांपूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले होते. या चित्रपटात प्रसाद ओक याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटातील गाणी देखील लोकप्रिय ठरली होती. मराठी चित्रपट, नाट्य अभिनेता प्रवीण तरडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळाशी तालुक्यातील जाताडे येथे झालेला आहे. प्रवीण तरडे हे शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते.

त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. त्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला. सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.प्रवीण तरडे यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अनेक मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखन देखील केले आहे.

देऊळबंद या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. त्यांचा काही वर्षांपूर्वी आलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवीन ओळख निर्माण करून दिली होती. सध्या ते एका वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता.

प्रवीण तरडे हे अतिशय बेधडक स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. आता प्रवीण तरडे यांच्यासोबत एक भयंकर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चहात्यांना माहिती दिली आहे.

प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे की, माझे सोशल मीडिया अकाउंट कोणीतरी केले आहे. या अकाउंटवर माझ्या महत्त्वाच्या लिंक आणि नंबर देखील होते. हॅक केलेला व्यक्ती हा सर्वांना माझे नंबर आणि लिंक देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी या व्यक्तीसोबत आपण सावधानतेने व्यवहार करावा.

तसेच काही अक्षपार्ह आढळले, तर माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन देखील यांनी केले आहे, तर प्रवीण तरडे यांच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral