प्रेयसीला चुकूनही सांगू नका ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर नाते सुरू व्हायच्या आधीच तुटेल

प्रेयसीला चुकूनही सांगू नका ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर नाते सुरू व्हायच्या आधीच तुटेल

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला डेट करणं सुरु करतो तेव्हा जास्तीत जास्त आपली चांगली बाजू त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याविरुद्ध अशाही काही वाईट गोष्टी आपल्या मध्ये असतात ज्या आपल्या जोडीदाराला समजणं अत्यंत गरजेचं असतं. हे महिला व पुरूष दोघांनाही लागू होतं. पण असं म्हटलं जातं की महिला गोष्टी लपवण्यात माहिर असतात तर पुरुष नको त्या गोष्टीही त्यांच्यासमोर कळत-नकळत बोलून जातात.

ज्यामुळे नातं तुटण्याच्या मार्गावर येतं. तुम्ही एकमेकांना किती ओळखता व एकमेकांच्या सवयी तुम्हाला किती माहित आहेत ही गोष्ट वेगळी पण काही गोष्टी नक्कीच अशा असतात ज्या जोडीदाराला न समजणंच उत्तम असतं. कारण त्या समोर आल्या तर नातं कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुलांनी त्या कोणत्या ५ गोष्टी प्रेयसीला कधीच सांगू नयेत? याविषयी आम्ही आज सांगणार आहोत.

मैत्रीणींसोबतची मजा-मस्ती – भलेही तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत कितीही प्रामाणिक का असेना पण कोणत्याच मुलीला हे आवडणार नाही की आपला जोडीदार आपल्याला सोडून इतर परक्या मुलींसोबत सिनेमा पाहायला किंवा फिरायला गेला. प्रेयसीला न सांगता तुम्ही कधी असं केलं असेल तर चुकूनही तिला हे सांगू नका.

मित्रांसोबत फिरणं, प्लान बनवणं याबद्दल मुलींना काहीच समस्या नसते पण जोडीदाराच्या फिमेल फ्रेंड्सबद्दल प्रत्येक मुलगी जेलस फिल करते. जो कित्येकदा जोडप्यांत वादाचा विषय बनतो. खोटं बोलणं हा उपाय नसल्यामुळे कधी खोटं बोलून असं वागूच नका पण अजानतेपणी तुमच्याकडून असा प्लान झाला असेल जो तिला माहित नसेल तर तिला न दुखावण्याच्या हेतूने ते लपवूनच ठेवा.

तिचे आई-बाबा आवडत नाही – भलेही तुमच्या प्रेयसीचे आई-वडिल तुमच्या नात्यात जरा जास्तच इन्टरेस्ट घेत असतील किंवा तुम्हाला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवरून सतत टोकत असतील आणि जे तुम्हाला आवडत नसेल तर ही गोष्ट अजिबात तिला सांगू नका. कारण प्रत्येकासाठीच आपले आई-वडिल देवासमान असतात त्यामुळे तुमचं असं बोलणं कदाचित तिला दुखावू शकतं.

असंही मुळीच नाही की ती दुखावली जाईल म्हणून भावना दाबून ठेवाव्यात व मनातच कुंठत राहावं, पण व्यक्त व्हायचंच असेल तर शब्दांचा योग्य ठिकाणी योग्य वापर करायला विसरू नका. जेणे करून याचा नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये.

टेक्सटिंग आवडत नाही – आजकालच्या काळात अनेक मुलगे असे असतात ज्यांना मेसेजवर बोलणं अजिबात आवडत नाही. पण मनात असून सुद्धा ते ही गोष्ट आपल्या प्रेयसीला सांगू शकत नाहीत. असं मानलं जातं की मेसेज नात्यात मधुरता बनवून ठेवण्यास खूपच मदत करतात पण काही लोकांचा असाही अनुभव आहे की मेसेज हेच अनेकदा नातं तुटण्याचंही सर्वात मोठं कारण बनतात. तसं पाहायला गेलं तर कॉलवर आपलं मत किंवा भावना मांडणं कधीही सुरक्षित व उत्तम असतं पण जर तुमची प्रेयसी मेसेजमध्ये कम्फर्टेबल असेल तर तिचं मन दुखावू नका.

मित्राच्या प्रेयसीचं कोडकौतुक – यात काहीच शंका नाही की मुलींच्या बाबतीत मुलं थोडीशी चंचल असतात. म्हणजे कधी कधी मनापासून आपली प्रेयसी आवडत असतानाही डोळ्यांना मात्र मित्राची किंवा इतर मुली जास्त आकर्षक वाटू लागतात. त्यामुळे तुमची प्रेयसीसोबत कितीही चांगली बॉन्डिंग असो पण तिच्यासमोर दुस-या मुलींचं कोडकौतुक कधी गाऊच नका. मुलींना आपली तुलना कोणत्या मुलीसोबत केलेली कधीच आवडत नाही. त्यामुळे या परिस्थितीपासून थोडं चार हात लांब राहिलेलं कधीही उत्तम.

आई-वडिलांची प्रेयसीविषयीची मते – काही मुलं ही अगदी मनमोकळ्या स्वभावाची असतात तर काही मुलं मोजकं बोलणारी. पण मनमोकळ्या स्वभावाची मुलंं आपल्या पटकन व्यक्त होण्यामुळे कधी कधी प्रेयसीसमोर गोत्यात येतात. जसं की प्रत्येक आई-वडिलांच्या आपल्या होणा-या सूनेकडून भरपूर अपेक्षा असतात.

हल्लीचे बहुतांश पालक हे आपल्या सूनेला लग्नाआधीपासूनच पाहत असतात किंबहुना त्यांचे एकत्र उठणे-बसणे असते. अशावेळी कोणती गोष्ट खटकली तर ते सहाजिकच त्याबद्दल आपल्या मुलाजवळ व्यक्त करतात पण याचा अर्थ असा मुळीच नाही की ती गोष्ट प्रेयसीला राग येईल किंवा वाईट वाटेल अशा पद्धतीने सांगावे. तीला ही गोष्ट न सांगितलेलीच बरी किंवा सांगायची असेल तर वेगळ्या पद्दतीने सांगावी.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral