‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेमधील मोनिका ने दिली ‘गुडन्यूज’

तुझेच मी गीत गात आहे, ही मालिका सध्या जोरदार गाजत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अनेक वर्षानंतर उर्मिला कोठारे कानिटकर ही दिसली आहे. मात्र मध्यंतरी ही मालिका बंद होणार असे देखील सांगण्यात येत होते. ही मालिका अनेकांची आवडती मालिका बनली आहे.
या मालिकेमध्ये एक वेगळी कहाणी आपल्याला दाखवण्यात आली होती. या मालिकेमध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर आपल्याला अभिजीत खांडकेकर हा दिसला आहे. या मालिकेत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये छोटी मुलगी देखील दिसली आहे.
तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे, तर या मालिकेचे कथानक हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे असल्याने या मालिकेला अनेक जण पसंत देखील करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला अनेक वर्षानंतर प्रिया मराठे ही देखील दिसली आहे. प्रिया मराठे हिने याआधी अनेक मालिकेमध्ये काम केले आहे.
अनेक मालिकामध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. याआधी तिने तू तिथे मी या मालिकेत देखील नकारात्मक भूमिका साकारली होती. तिची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती, तर आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये देखील ती नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.
तिची नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांना खूप आवडते. प्रिया मराठे ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील सहज असते. आता प्रिया मराठे हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांनी देखील खूप पसंती दिली आहे.
प्रिया मराठे हिने instagram वर पाच लाख 80 हजार फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तिचे इंस्टाग्राम अकाउंट हे आता व्हेरिफाय झाले आहे. त्यामुळे तिने चहात्यांना गुडळून देऊन सांगितले आहे की, धन्यवाद चाहत्यांनो, माझे इंस्टाग्राम अकाउंट आता व्हेरिफाय झाले आहे. आता instagram च्या माध्यमातून देखील प्रिया मराठे ही पैसे कमवू शकते.
त्यामुळेच तिने आपल्या चाहत्यांशी ही माहिती शेअर केली आहे, तर आपल्याला प्रिया मराठे आवडते का? तिने काम केलेली मोनिकाची भूमिका आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.