प्रियांका चोप्राने पुन्हा शेअर केली ‘गुडन्यूज’

प्रियांका चोप्राने पुन्हा शेअर केली ‘गुडन्यूज’

बॉलीवूड मध्ये प्रियंका चोप्रा हिची‌ कायमच चर्चा होत असते. प्रियंका चोप्रा हिने काही वर्षापूर्वी पाश्चात्य गायक निक जोन्स याच्या सोबत लग्न केले. तिने लग्न केल्यानंतर या दोघां बाबत खूप चर्चा होताना दिसत असतात. प्रियंका ही नीकच्या पेक्षा खूप मोठी आहे.

मात्र, असे असतानाही तिने नीक सोबत लग्न केले आहे. आता दोघेही आपल्या संसारात रममाण झालेले आहेत. मात्र, तसे असले तरी दोघांचे वाद-विवाद अनेकदा समोर येत असल्याचे देखील सोशल मीडियातील कळत असते. प्रियंका आणि निक यांनी काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून एका बाळाला जन्म दिला आहे.

प्रियंकाचे वय हे अधिक असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. प्रियंका हिने काही वर्षापूर्वी अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंदाज चित्रपटात तिच्यासोबत लारा दत्ता ही देखील होती. या चित्रपटात प्रियांका चोप्राची भूमिका अतिशय बोल्ड अशी होती.

त्यामुळे प्रियंका आणि अक्षय यांच्यामधील नात्याबाबत देखील तेव्हां चर्चा खूप करण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका चोप्रा हिने अनेक चित्रपटात काम केले. प्रियंका हिचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. त्याचप्रमाणे 7 खून माफ या चित्रपटातील तिच्या वैविध्यपूर्ण त्यांचेही कौतुक झाले होते.

या चित्रपटात तिने सात वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. बाजीराव मस्तानी या चित्रपटात बाजीराव पेशवे यांच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. प्रियंका चोप्रा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेने सगळ्यांचेच मन जिंकून घेतले होते. आता देखील प्रियंका चोपडा बॉलिवूडमध्ये जास्त सक्रिय नाही आहे. याचे कारण म्हणजे ती अमेरिकेत सध्या राहत असते.

अमेरिकेतील आता काही अल्बम आणि हॉलीवुड चित्रपटातही काम करणार असल्याचे सांगण्यात येते. अनेकदा आपला पती नीक आणि प्रियंका हे पार्ट्यांमध्ये जातांना दिसत असते. अनेकदा दोघांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्ये दोघांचे प्रेम हे खूप उफाळून आल्याचे दिसत असते.

आता प्रियंका चोप्राच्या बाबत एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. ती म्हणजे प्रियंका चोप्रा हिने गुड न्यूज दिली आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, असे काही नाही प्रियंका चोप्रा हिची जाऊ म्हणजेच हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर आणि गायक जो जोनास लवकरच दुसऱ्या बाळाचे आई-बाबा होणार आहेत. जो आणि सोपी ला यापूर्वीही एक मुलगी आहे.

तिचे नाव विला असे आहे. आता पहिले बाळ दोन वर्षाचे झाल्यानंतर हे दाम्पत्य दुसऱ्या बाळाचेही स्वागत करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने जो चा वाढदिवस आणि प्रेग्नेंसी चा आनंद देखील साजरा केला होता. गेल्या महिन्यात सोफी आणि जो एकत्र फिरताना दिसले होते. सोफी तिच्या कुटुंबासोबत असताना मैक्सी ड्रेसमध्ये दिसली.काही फोटोमध्ये तिचा बेबी बंप हा स्पष्ट दिसला.

त्यामुळे प्रियंका चोपडा आता लवकरच जाऊबाई होणार आहे. सोफी आणि जो यांनी 2015 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 2019 मध्ये या जोडप्याने लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता. 2020 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला होता.

Team Hou De Viral