प्रियंका चोप्राला अंतर्वस्त्र दाखवायला सांगितले होते दिग्दर्शकाने, सलमानने आक्षेप घेत केली होती तिची मदत

प्रियंका चोप्राला अंतर्वस्त्र दाखवायला सांगितले होते दिग्दर्शकाने, सलमानने आक्षेप घेत केली होती तिची मदत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा फक्त भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्रा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे तिचे पुस्तक अनफिनिश्ड. ९ फेब्रुवारीला प्रियंकाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

त्यानंतर या पुस्तकातील गोष्टींवर चर्चा होताना दिसते आहे.या पुस्तकात प्रियंकाने बऱ्याच कलाकारांचा उल्लेख केला आहे. असाच एक किस्सा सलमान खानशी निगडीत आहे. एकदा एका चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियंका चोप्राशी वाईट पद्धतीने बोलत होता. त्यावेळी सलमान खान प्रियंका चोप्राच्या मदतीला धावून आला होता.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियंकाने तिच्या या पुस्तकात एका चित्रपटाच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे. या चित्रपटात एक सिडक्टिव्ह गाणे होते. या गाण्यासाठी प्रियंकाला तिचे एकेक एक कपडे काढायचे होते. हे एक मोठे गाणे होते.

प्रियंकाने म्हटले होते की, ती एक्स्ट्रा बॉडी लेअर घातले तर चालेल का? कारण तिला तिची स्कीन दाखवायची नव्हती.यावर दिग्दर्शकाने तिला म्हटले की तू तुझ्या स्टायलिस्टशी बोल. दिग्दर्शकाने हेदेखील म्हटले की जे काही करशील ते पण चड्डी दिसलीच पाहिजे. नाहीतर लोग चित्रपट पहायला येणार नाहीत.

ही गोष्ट ऐकल्यावर प्रियंकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने दुसऱ्याच दिवशी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तिचा हा निर्णय दिग्दर्शकाच्या अंगाशी आला. प्रियंकाने सांगितले का तिचा हा चित्रपट करिअरच्या सुरूवातीच्या काळातील होता आणि या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होते.

जेव्हा प्रियंका कोणत्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत होती तेव्हा चित्रपटाचे निर्माते रागात तिला भेटायला आले. त्यावेळी सलमान खानने मध्यस्थी करत हे प्रकरण सांभाळले होते. याबद्दल प्रियंकाने लिहिले की, माझा सहकलाकार सलमान खान भारतातील खूप मोठा स्टार होता. त्याने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि लगेच माझ्या बाजूने उभा राहिला.

जेव्हा निर्माते प्रियंकाशी बोलायला आले तेव्हा सलमान त्यांच्याशी बोलला आणि हे प्रकरण सोडवले. मला माहित नाही की सलमान खानने त्यांच्याशी काय बोलणे केले. पण त्यानंतर निर्मात्यांचे माझ्याशी बोलण्याची पद्धतच बदलून गेले.

मात्र प्रियंकाने या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र असे बोलले जात आहे की हा चित्रपट २००४ साली रिलीज झालेला मुझसे शादी करोगी असू शकतो. या चित्रपटात सलमान खान प्रियंका चोप्रासोबत मुख्य भूमिकेत होता.

Team Hou De Viral