शरीराच्या पृष्ठभागावर फोड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात.. एकदा हे उपाय करून बघाच

आपल्या शरीरावर अनेक जागी फोड येत असल्याचे आपण आजवर पाहिले असेल. फोड हे प्रामुख्याने चेहऱ्यावर येत असतात. मात्र, फोड येत असतील तर आपली फार वाईट परिस्थिती होते. त्यामुळे आपण यावर वेळीच उपाय योजना करून संसर्ग रोखला पाहिजे. अवघड जागी फोड असल्यास आपल्याला बसण्याचा देखील त्रास होतो. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. मात्र आपण काही घरगुती उपाय करून काळजी घेतली तर आपण यावर मात करू शकता.
1) आपण जीमला जातात, त्या वेळेस आपल्या शरीरावर अतिशय घट्ट कपडे असतात. मात्र, हे कपडे जिम वरून आल्यानंतर घामेजलेले असतात. त्यामुळे आपल्याला फोड येण्याची समस्या असते. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात आपल्या अवघड जागी फोड येऊ शकतो.
2) फिटिंग कपडे : पूर्वीचा जमानामध्ये अनेक लोक हे मोकळे कपडे घालत होते. मात्र, सध्याच्या जमान्यात फिटिंगचे कपडे घालण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. यामुळे देखील अवघड जागी फोड येण्याची समस्या अनेकांना उद्भवत आहे.
3) सध्याच्या काळामध्ये अनेकांना बारा-बारा तास ऑफिसला काम करावे लागते. त्यामुळे त्यांचे एकाच जागी बसणे होते. यामुळे देखील अवघड जागी फोड येण्याची समस्या अनेकांना असते. त्यामुळे मध्ये मध्ये उठत जावे. त्यामुळे आपल्याला ही समस्या होणार नाही.
4) अनेकांच्या त्वचेवर घाण जमा झालेली असते. यामुळे देखील फोड येण्याची समस्या होते. तसेच अवघड जागी चांगल्या पद्धतीने अंघोळ न झाल्याने देखील फोड येण्याची समस्या असते.
हे करावे उपाय
1) आपण ज्या वेळी जिमला जाऊन आलात तसेच घरगुती व्यायाम जरी केला तरी आपण नंतर तातडीने अंघोळ केली पाहिजे. यामुळे आपल्या शरीरावरील सर्व घाण निघून जाते आणि आपल्याला फोड येण्याची समस्या राहत नाही.
2) मिठाचे पाणी : जर आपल्याला वारंवार ही समस्या असेल तर आपण आंघोळदरम्यान मिठाचे पाणी अंगावर घ्यावे. यामुळे आपल्याला फोडावरील घाण ही निघून जाते आणि आपल्याला फोड येण्याची समस्या राहत नाही.
3) लिंबाचा रस: ज्या ठिकाणी आपल्याला फोड आलेले आहेत अशा ठिकाणी आपण लिंबाचा रस लावा. त्यामुळे आपल्या फोडा वरील घाण निघून जाते आणि आपला फो ड निघून जातो.
4) बेकिंग सोडा : जर आपल्याला फोड येण्याची समस्या असेल तर आपण घरगुती उपाय करू शकता. आपण बेकिंग सोडा याची पेस्ट करुन ज्या ठिकाणी फोड आला आहे त्या ठिकाणी लावावे, असे केल्याने आपला फोड हा निघून जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.