‘रंग माझा वेगळा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्री आहे सख्खा बहीणी

‘रंग माझा वेगळा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्री आहे सख्खा बहीणी

स्टार प्रवाह सुरू असलेल्या रंग माझा वेगळा आणि मुरंबा या मालिकेत काम करणाऱ्या दोन अभिनेत्री या सख्या जावा आहेत तर मुरंबा या मालिकेमध्ये अक्षयच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुलेखा तळवळकर आणि रंग माझा या वेगळा मध्ये पूर्णिमा तळवळकर या खऱ्या आयुष्यात जावा जावा आहेत.

या दोन्ही अभिनेत्रींनी नाटक चित्रपट मालिका या सगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. अभिनेत्री सुलेखा तळवळकर या दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या सुनबाई आहेत. तर स्मिता तळवळकर यांच्या पुतण्याची बायको म्हणजे पौर्णिमा तळवळकर आहेत. त्यामुळेच या दोघी जावा जावा आहेत.

त्या चुलत जावा असल्या तरी त्यांचे नाते हे अतिशय चांगल्या पद्धतीने रंगत असल्याचे बोलले जाते. पोर्णिमा तळवळकर यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. पौर्णिमा तळवळकर यांनी याआधी ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी श्रीच्या अत्याची भूमिका केली होती.

तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिच्या भूमिकेला गौरवले देखील होते, तर सुलेखा तळवळकर या देखील अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये आपल्याला अधून मधून दिसत असतात. हे तर आपल्याला माहीतच आहे.

मात्र, आता रंग माझा वेगळा मालिकेमध्ये अनघाच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये शमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पल्लवी वैद्य खऱ्या आयुष्यामध्ये सख्ख्या बहिणी आहेत. या दोघी बहिणींनी ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.

या दोघी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना त्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती देखील देत असतात. आतापर्यंत पल्लवी हिने स्वराज्य रक्षक संभाजी, कुलवधू, अजूनही बरसात आहे अशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, तर पौर्णिमा तळवळकर यांनी होणार सुन मी या घरची यासारख्या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे.

फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकांमध्ये ही त्यांची भूमिका ही अतिशय दर्जेदार अशी झाली होती, तर या सख्या बहिणींची जोडी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral