‘पुढचं पाऊल’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, केली सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

‘पुढचं पाऊल’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, केली सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

2017 पर्यंत स्टार प्रवाह या वाहिनीवर “पुढचं पाऊल” ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर यांनी अतिशय अप्रतिम असे काम केले. याच बरोबर या मालिकेमध्ये जुई गडकरी ही अभिनेत्री दिसत होती. 2011 पासून सुरू असलेली ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल सहा वर्षांपर्यंत सुरू होती. 2017 मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

यामध्ये जुई गडकरीने कल्याणी सरदेशमुख नावच पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. जुई गडकरी ही मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मराठी मालिका चित्रपटात काम केलेले आहे. मराठी मालिका चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी तिने अनेक जाहिराती आणि नाटकांमध्ये देखील काम केल्याचे सांगितले. जुई गडकरी सध्या ३३ वर्षाची आहे.

“पुढचं पाऊल” या मालिकेमध्ये तिच्यासोबत काम करणारा अभिनेता प्रसाद लिमये सोबत तिची चांगली गट्टी जमली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे देखील सांगण्यात येत होते. मात्र, या दोघांनी याबाबत कधीही कुणाला सांगितले नव्हते. मात्र असे असले तरी या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगत असते. त्याचबरोबर जुई गडकरी हिने “माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेत देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन केले होते.

त्यानंतरही तिने “तुजविण सख्या रे” ही मालिका केली होती. या मालिकेत अफलातून असे काम केले होते. याचबरोबर जुई गडकरीने काम केले होते. “श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी” ही मालिका देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात मध्ये यशस्वी ठरली होती. तिची भूमिका या मालिकेतही प्रचंड गाजली होती. जुई गडकरी अधून मधून आता चर्चेत असते. सोशल मीडिया वर ती आपल्या चाहत्यांना नेहमी संवाद साधत असते.

तसेच आपले काही म्हणणे असेल तर ते देखील ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. याच बरोबर चाहते देखील तिला काही प्रश्न विचारत असतात. आपले अनेक फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड करत असते. या फोटोला लाईक आणि शेअर करत असतात.जुई गडकरी हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून दिलेला आहे. तसेच तिने काही फोटो देखील अपलोड केलेले आहे.

त्यामध्ये ती तिची लाडकी कुत्री माफिया हिच्यासोबत दिसत आहे. माफीयाचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ती अतिशय भावूक झाली आहे. याबाबत सांगितले की, “माझ्या लाडक्या व्यक्तीला मी आज गमावले आहे”, त्यामुळे मी प्रचंड दुःखी आहे. तिच्या फोटोवर अनेकांनी तिच्या कुत्रीला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. जुई गडकरी हिने वर्तुळ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

Team Hou De Viral