ही व्यक्ती भारतात परतल्यानंतर पुनीत राजकुमार यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

ही व्यक्ती भारतात परतल्यानंतर पुनीत राजकुमार यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

पुनीत राजकुमार यांनी वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. साऊथचा सुपरस्टार पुनीत यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शुक्रवारी सकाळी बेंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुनीत राजकुमारच्या निधनानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांसह सर्व बड्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाची माहितीसमोर आल्यानंतर आता चाहत्यांमध्ये त्यांना अखेरचं पाहाण्यासाठी चाहत्यांनी एकचं गर्दी केली आहे. पुनीत यांच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

पुनीत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना आणि कुटुंबियांना पाहाण्यासाठी ठेवण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अभिनेत्याच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहिली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी कांतीराव येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. एएनआयच्या ट्विटनुसार, अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यांची मुलगी भारतात पोहोचल्यानंतरच पुनीत यांना अंतिम निरोप देण्यात येईल.

Team Hou De Viral