फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन, पतीच्या निधनानंतर पडली होती…

फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन, पतीच्या निधनानंतर पडली होती…

गेल्या काही दिवसापासून मराठी हिंदी तसेच बॉलीवूड मधून अनेक धक्कादायक बातम्या समोर आलेल्या आहेत. अनेक कलाकार आपल्याला सोडून जात असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील शेंडे यांचे नुकतेच दीर्घ आजारांनी निधन झाले. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले. त्याचबरोबर मराठमोळी अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा देखील अपघातात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्याचबरोबर दक्षिणचे सुपरस्टार महेश बाबू यांच्या वडिलांचे देखील नुकतेच निधन झाले आहे.

दक्षिणातील सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील कृष्णा हे देखील दिग्दर्शक अभिनेते होते. त्यांनी देखील नुकताच अखेरचा श्वास घेतला. आता देखील एका पंजाबी अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीने पंजाबीसह हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता. या अभिनेत्रीचे नाव दलजीत कौर असे आहे.

दलजीत यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक वर्षापासून आजारी होत्या, अशी माहिती समोर आली आहे, तेव्हापासून त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले होते. दलजीत कौर यांनी दहापेक्षा अधिक हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता. त्याचबरोबर त्यांनी सत्तरहून अधिक पंजाबी चित्रपटातही आपल्या भूमिकानी सगळ्यांनाच भुरळ पाडली होती.

दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. 1976 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी चांगले काम केले. दलजीत यांचे पती हरमिंदर सिंह यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले.

Punjabi actor Daljeet Kaur dies

पतीच्या निधनानंतर त्या आजारी पडल्या होत्या. 2001 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कम बॅक केला होता. मात्र, त्यांना फारशी यश त्यावेळेस मिळाले नव्हते. आता त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Team Hou De Viral