सिद्धू मुसेवाला नंतर आता ‘या’ पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला; देतोय मृत्यूशी झुंज..

सिद्धू मुसेवाला नंतर आता ‘या’ पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला; देतोय मृत्यूशी झुंज..

मनोरंजन विश्वामध्ये अलीकडे हल्ल्याच्या घटना या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सिद्धू मूसेवाला या पंजाबी गायकाची हत्या करण्यात आल्याची प्रकरण ताजे असतानाच आता देखील एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

सिद्धू मूसेवाला या प्रसिद्ध पंजाबी गायकाची हत्या करण्यात आल्यानंतर अटलांटिका येथील प्रसिद्ध रॅपर ट्रबल याची ही हत्या करण्यात आली. सिद्धू याची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, 34 वर्षीय ट्रबल याचे खरे नाव वेगळच आहे. तो तेव्हा रविवारी पहाटे तीन वाजता राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला आहे.

घरगुती वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. आता ट्रबल याची हत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास देखील पोलीस घेत आहेत. सर्व बाजूनी हा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

आता प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाजच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अल्फाज एक प्रसिद्ध गायक आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेता देखील आहे. अल्फाज याचा जन्म पंजाबमध्ये झालेला आहे. त्याचे खरे नाव अंजूसिंग असे आहे. त्याने 2011 मध्ये मेरा दिल पंजाबी या गाण्यातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

याशिवाय अल्फाजने अनेक चित्रपटात देखील गाणी गायलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता याच्यावर हल्ला करण्यात आल्याने अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून त्याच्या आजूबाजूला काही संशयास्पद व्यक्ती देखील फिरत असल्याची माहिती समोर आली आहे.

आता पोलीस त्यादृष्टीने देखील तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येते. आता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून असे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्यामुळे तातडीने या प्रकरणात लवकरात हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Team Hou De Viral