पहिल्यांदा मासिक पाळी आली म्हणून ह्या अभिनेत्रीने ठेवली होती मोठी पार्टी, एवढा रक्तस्राव पाहून…

मासिक पाळी बद्दल चर्चा करण्याबद्दल आजही महिला टाळाटाळ करतात. खरंतर ह्या विषयावर अनेक चित्रपट देखील बनवले गेले आहेत, तरीही लोक अजूनही ही गोष्ट खुलेपणाने बोलत नाही. ह्यात बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तिने आपल्या पहिल्या मासिक पाळी च्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
राधिका आपटे ने असे सांगितले की जेव्हा तिला पहिल्यांदा पाळी आली होती तेव्हा तिच्या आईची काय प्रतिक्रिया होती. राधिका ने हे सुद्धा सांगितले की सुरवातीला तिला दुकानातून सेनेटरी पॅड विकत घ्यायला देखील लाज वाटत होती. आम्ही सांगू इच्छितो की ही विडिओ २०१८ मध्ये आलेला चित्रपट ‘पॅडमॅन’ च्या प्रोमोशन च्या वेळचा आहे.
ह्यावेळी राधिकाने प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या पहिल्या पाळीचा अनुभव सांगितला. ह्यावेळी तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनम कपूर सुद्धा होती. राधिका म्हणाली – ” मी अशा कुटुंबाशी निगडित आहे जिथे डॉक्टर आहेत. मला पहिलेच सांगितले गेले होते की पाळीला सुरवात होणार आहे त्यामुळे मला त्याचा अधिक अंदाज होता. पण हे नव्हते माहीत की कधी होणार “
राधिका सांगते, ” ज्या दिवशी माझी पहिली पाळी आली, त्या दिवशी मला आईने घरात पार्टी ठेवण्यास सांगितले. माझ्या परिवारातील सगळे सदस्य आणि मित्र घरी आले. आम्ही थाटामाटात सेलिब्रेशन केले.” राधिका ने सांगितले की तिच्या शरीरातुन खूप रक्तस्त्राव झाला परंतु ती रडली नाही. प्रत्येकजण तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता त्यामुळे ती खुश होती.
सुरवातीला जेव्हा सेनेटरी पॅड घ्यायला जायची तेव्हा लाज वाटायची. ही लाज किंवा भीती दूर करण्याचे तिने ठरवले. त्यासाठी तिने एक शक्कल लढवली. एक दिवस ती पॅड घेण्यासाठी गेली आणि जोरात ओरडून पॅड मागितले की खूप लोकांना ऐकायला जाईल त्यामुळे तिची पॅड घेण्याची लाज आणि भीती कायमची दूर झाली.
राधिका चा प्रवास २००५ मध्ये आलेला सिनेमा ‘ वाह! लाईफ हो तो ऐसी!’ मध्ये सुरू झाला. आपल्या बो ल्ड अंदाजाने तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यासोबतच तिच्याशी अनेक आक्षेपार्ह बातम्या देखील पसरल्या. हंटर , बदलापूर, मांझी द माऊंटन मॅन ह्या सिनेमामध्ये तिने काम केले.
तिने साऊथ सिनेमात देखील मुख्य भूमिकेत काम केले. तिला ‘रक्तचरित्र’ , ‘कबाली’, शोर इन द सिटी आणि धोनी ह्या सारख्या सिनेमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल ओळखले जाते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.