ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षातून फक्त 12 वेळा भेटते तिच्या नवऱ्याला, त्यामागचे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल

ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षातून फक्त 12 वेळा भेटते तिच्या नवऱ्याला, त्यामागचे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल

अल्पवधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारुन अभिनेत्री राधिका आप्टेने बॉलीवुड आणि मराठीच नाहीतर जगभरातील रसिकांची मनं जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाईलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर पसरलेत.

बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख.

वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. ब-याचदा तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चा रंगत असतात. राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली आहेत. राधिका लग्नानंतरही फार कमी वेळा नव-यासोबत वेळ घालवताना दिसलीय.

लग्नानंतर राधिका मुंबई ते लंडन अशी येऊन जाऊन असते. सतत कामात बिझी असल्यामुळे राधिका पतीसह इच्छा असूनही राहू शकत नाही. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ती जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देणे तिला शक्य होत नाही. लॉकडाऊनमध्येच राधिका पहिल्यांदा इतकी पतीसह राहत असावी.

मार्च महिन्यात कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवायला सुरूवात केली होती तेव्हा काळजीपोटी लंडनला रवाना झाली आणि पतीसह वेळ घालवताना दिसली. राधिकाच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोयचे झाले तर, तिने आजवर मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील सिनेमा, वेबसीरिज आणि लघुपटात काम केल्यानंतर आता ती हॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे.

या सिनेमाची घोषणा खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर केली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘अ कॉल टू स्पाय’. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय सिनेमा आयएफसी फिल्मने घेतला आहे. राधिकाने सोशल मीडियावर गुड न्यूज देत सांगितले की, या सिनेमाच्या प्रदर्शनाचे राइट्स नॉर्थ अमेरिकेतील प्रोडक्शन कंपनीने घेतले आहेत. यासोबत तिने या सिनेमातील तिचा फोटोही शेअर केला होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral