बॉलिवूड कलाकारामुळे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा झाला अपमान, मराठी प्रेक्षक भडकले

बॉलिवूड कलाकारामुळे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा झाला अपमान, मराठी प्रेक्षक भडकले

मराठी चित्रपट सृष्टीला अतिशय समृद्ध असा वारसा आहे. चित्रपटाप्रमाणेच संगीत क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात वारसा आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले यांच्यापासून आजच्या कार्तिकी गायकवाड यांच्यापर्यंत सर्वच गाणी गाणार यांनी मराठी चित्रपटसृष्टीत गाजवून सोडलेली आहे.

यामध्ये शास्त्रीय संगीत यांचा देखील बोल बाला खूप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या अवीट सुरांनी सर्व देशाला मंत्रमुग्ध केले आहे. पंडित भीमसेन जोशी यांना याच कार्यासाठी भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर वसंतराव देशपांडे यांनी देखील आपल्या मधुर स्वरांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते.

त्यानंतर त्यांचा नातू राहुल देशपांडे देखील आता अप्रतिम असे संगीत व गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसत असतो. मात्र, आता राहुल देशपांडे यांच्या बाबतीत एक भयंकर प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा जाहीर अपमान करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे.

सचिन अहिर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, भाजपच्या वतीने वरळी येथे आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे यांचा अपमान झाला. कार्यक्रम सुरू असतानाच अभिनेता टायगर श्रॉफ या ठिकाणी आला आणि आयोजकांनी राहुल देशपांडे यांना मध्येच थांबण्यास सांगितले.

मात्र, त्यावर राहुल देशपांडे यांनी देखील आयोजकांना याचा जाब विचारला तरी देखील आयोजकांनी टायगर श्रॉफ याचा सत्कार केला. त्यानंतर राहुल देशपांडे हे चांगलेच संतापल्याचे समोर आले. विशेष म्हणजे याबाबतचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल देशपांडे आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

राहुल देशपांडे यांनी या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला एक गाणे गायले. त्यानंतर सूत्रसंचालकांनी आपण आता पाच मिनिटे ब्रेक घेऊ, असे सांगितले. त्यावर राहुल देशपांडे यांनी तातडीने त्या सूत्रसंचालकाला बोलावले आणि मी वीस मिनिटे गाणार आहे. वीस मिनिटानंतर तुम्ही तुमचे सोपस्कार काय पाडायचे ते काढून घ्या. मला मध्येच त्रास देऊ नका. नाहीतर मी गाणे थांबवतो, असे त्यांनी सांगितले.

मात्र त्यानंतरही स्टेजवर थेट आमदार हे टायगर श्रॉफ याला घेऊन आले आणि त्याचा जाहीर सत्कार केला. त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी देखील टाळ्या वाजवल्या. मात्र, यामुळे राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याची भावना आता मराठी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र भाजपच्या आमदाराची पाठराखण केली आहे.

तर दुसरीकडे रिपाई चे नेते सचिन खरात यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितले की, मराठी माणसाचा कळवळा असलेले राज ठाकरे आता गप्प का आहेत, ते आता का बोलत नाहीत. तसेच सचिन सावंत यांनी देखील यावर टीका केली आहे. टायगर श्रॉफ याला थांबवायला पाहिजे होते आणि राहुल देशपांडे यांना गाणी म्हणायला द्यायला पाहिजे होते.

राहुल देशपांडे हे मोठे गायक आहेत. त्यांना अशा प्रकारे थांबवणे योग्य नाही. आता एकूणच मराठी चित्रपट सृष्टी मधून देखील यावर आक्षेप नोंदवून भाजपच्या कार्यक्रमावर टीका करण्यात येत आहे.

Team Hou De Viral